Browse Results

Showing 51 through 75 of 112 results

Ganit Bhag 1 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

गणित भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Ganit Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

गणित भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सात पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Itihas Digest class 11 - Maharashtra Board Guide: इतिहास डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

इतिहास इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला पाठाचा सारांश देण्यात आला आहे. त्यावरून त्त्या प्रकरणात समाविष्ट असलेला पाठाचा आशय विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत. या मार्गदर्शकात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. तसेच या मार्गदर्शकाच्या शेवटी प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार प्रथम व द्वितीय सत्रान्त परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका व अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत.

Itihas Va Rajyashastra Digest class 10 - Maharashtra Board Guide: इतिहास व राज्यशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, मार्गदर्शकाचे दोन भाग इतिहास व राज्यशास्त्र दिलेले आहेत. या 'नवनीत' मार्गदर्शकात पाठाच्या प्रारंभी पाठात आलेले महत्त्वाचे सन व घटना चौकटीत दिलेल्या आहेत. प्रत्येक पाठातील महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीस दिलेले आहेत, पाठात आलेल्या काही संकल्पना स्पष्ट झाल्या नाहीत तर तो आशय कळणार नाही; म्हणून तेथेच चौकटीत त्यांचे स्पष्टीकरणही दिलेले आहे. प्रत्येक पाठाखाली दिलेल्या स्वाध्यायांतील सर्व प्रश्नांची आदर्श व अचूक उत्तरे दिलेली आहेत. संकल्पनाचित्रे पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा, ओघतक्ता तयार करा इत्यादी कृतीआधारित नव्याने आलेल्या प्रश्नप्रकारांचा सराव होण्यासाठी स्वाध्यायांखेरीज अनेक कृती या मार्गदर्शकात दिलेल्या आहेत.

Jhunj Sangharsh Jivanacha - Novel: झुंज संघर्ष जीवनाचा - कादंबरी

by Govind Gadhari

लेखकाच्या स्वत:च्या जीवनातील सत्य घटीत घटनांवरील हे लिखाण आहे. दुर्गम भागात रानोमाळ भटकंती करणाऱ्या असंघटित समाजातील एका दुर्बल आणि दुबळ्या कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीच्या जीवनात बालपणापासून ज्या संकटमय घटना घडल्या त्या त्याने अनुभवल्या व त्यांना ते कस कसे सामोरे गेले आणि त्यात त्यांनी अनुभवलेली, झेललेली संकटे व त्यावर कशी मात केली त्याचे त्यांनी गावरान मराठी भाषेत कथन केले आहे. प्रदीर्घ काळापर्यंतची त्यांची सत्य घटनांवर आधारीत अशी ही झुंज आहे.

Marathi Kumarbharati Digest class 10 - Maharashtra Board Guide: मराठी कुमारभारती डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी कुमारभारती इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पुस्तकामध्ये चार भाग दिले आहेत. पाठ्यपुस्तकातील सर्व पाठ, कविता व स्थूलवाचनाचे पाठ यांवर कृतिपत्रिका आराखड्यानुसार विविध कृती या नवनीतमध्ये दिल्या आहेत. कृतिपत्रिकेच्या आराखड्यातील अद्ययावत बदलांनुसार 'कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती' या प्रश्नप्रकाराचे मार्गदर्शन देऊन, तो सर्व कवितांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत 'नवनीत'मध्ये दिलेल्या अपठित उताऱ्यांच्या स्वतंत्र विभागात पाठ्यपुस्तकात दिलेले दोन अपठित उतारे, तसेच सरावासाठी अन्य उतारे आणि त्यावर आधारित आराखड्यानुसार अपेक्षित कृतींचा समावेश केलेला आहे.

Marathi Yuvakbharati Digest class 11 - Maharashtra Board Guide: मराठी युवकभारती डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी युवकभारती इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात एकूण पाच भाग दिलेले आहेत. त्यापैकी गद्य, पद्य, साहित्यप्रकार (नाटक), उपयोजित मराठी व व्याकरण. प्रत्येक गद्यपाठाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात लेखक/लेखिका व कवी/कवयित्री यांचा परिचय – लेखनवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांचा उल्लेख करून पुढे पाठाचा परिचय – शब्दार्थ – टिपा – वाक्प्रचार व अर्थ - कृति - स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे या क्रमाने पाठाचा सुसंगतवार अभ्यास करून दिला आहे. मार्गदर्शकात प्रत्येक नाट्यउताऱ्यावरील कृति-स्वाध्याय अचूक व समर्पक पद्धतीने सोडवून दिले आहेत. मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक कार्यात्मक व्याकरण घटकाचा यथायोग्य परामर्श घेऊन, सुबोध भाषेत समजावून देऊन प्रत्येक घटकासाठी दिलेल्या कृति-स्वाध्यायाची अचूक व समर्पक उत्तरे दिली आहेत.

Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी

by Ulhas Hari Joshi

आपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.

Pralay Janma Pralayacha - Novel: प्रलय जन्म प्रलयाचा - कादंबरी

by Shubham Suresh Rokade

"विनाश! मला विनाश दिसत आहे राजन. ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील, अर्धे आकाश काळेकुट्ट आणि अर्धे आकाश लाल रंगाचे असेल ; त्यावेळी जी जन्माला येईल ती तुझ्या वंशाचा निर्वंश करेल. राजन तुझा निर्वंश फार दूर नाही___! ती तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे___! “महर्षी, कोण 'ती'___? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात___? आणि हे कधी, कधी होणार आहे? मला फार चिंता वाटत आहे___? “फार दूर नाही राजन. तुझा मृत्यू, लवकरच तुझा मृत्यू होईल. तुझा पुत्र तुझे राज्य जेव्हा चालवायला घेईल त्या वेळी त्याच्या हातून अधम व घोर पापकर्मे घडतील. त्याच कर्माचे फळ म्हणजे तिचा जन्म आणि जेव्हा ती जन्माला येईल त्या क्षणापासूनतुझ्या तुझ्या वंशाचा अंतःकाळ काळ सुरू होईल. तुझा निर्वंश होण्याचा काळ सुरू होईल___ अशी प्रलय-जन्म प्रलयाचा ऐतिहासिक आणि थरारक कथा कादंबरी शुभम रोक़डे यांनी वाचकांच्या हाती घेऊन आले आहेत.

Rajyashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: राज्यशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

राज्यशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकाची (१) राजकीय संकल्पना, (२) तुलनात्मक शासन आणि राजकारण, (३) लोकप्रशासन आणि (४) आंतरराष्ट्रीय संबंध या चार विभागांत विभागणी करण्यात आली आहे. या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात वस्तुनिष्ठ, लघूत्तरी व दीर्घोत्तरी अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या उपयोजनात्मक प्रश्न व त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यांचा प्रत्येक प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

Samajshastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: समाजशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

समाजशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकाची (१) समाजशास्त्राची ओळख, समाजशास्त्रज्ञांचे योगदान आणि मूलभूत संकल्पना, (२) सामाजिक संस्था, (३) संस्कृती आणि सामाजीकरण, (४) सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक परिवर्तन या चार विभागांत विभागणी करण्यात आली आहे. या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात वस्तुनिष्ठ, लघूत्तरी व दीर्घोत्तरी अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या उपयोजनात्मक प्रश्न व त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यांचा प्रत्येक प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

Sarmisal - Novel: सरमिसळ - कादंबरी

by Shri. D.M. Mirasdar

द.मा. मिरासदार लिखित सरमिसळ हे विनोदी कथासंग्रह असून यामध्ये लेखकांनी आपला वेगवेगळ्या ठिकाणांचा अनुभव यामध्ये सांगितला आहे.

Utkranticha Rahasyabhed - Novel: उत्क्रांतीचा रहस्यभेद - कादंबरी

by Mohan Madwanna

आपण कोठून आलो? आपले काय होणार? आणि या पृथ्वीवर असलेल्या सजीवांशी आपला संबंध काय? या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न मानवाने पिढ्यांनापिढ्या केला आहे. भारतापुरता विचार करायचा तर तत्वज्ञांनी याचे उत्तर फक्त एका वाक्यात देऊन ठेवले आहे अनादि अनंत काळापासून हे असेच चालले आहे. मानव आहे तसाच आहे. यानंतर मानवाचा ईश्वर होणार. मुक्ती मिळणार. जिवाची शिवाशी भेट. मृत्यूनंतर पुन्हा चौऱ्या ऐंशी लक्ष योनीतून फेऱ्या. त्यानंतर मानवी जन्म वगैरे. आपल्या कर्मानुसार गती मिळणार स्वर्ग, नरक, पाताळ लोक, पिशाच्च योनी. ज्याला जे वाटले त्याप्रमाणे त्याने सांगितले. ज्यांनी विश्वास ठेवायाचा त्यांनी ठेवला. यातील कोणतीही बाब वैज्ञानिक रीत्या सिद्ध करण्याची आवश्यकता आहे असे कधी वाटलेच नाही. उत्क्रांती ही अशीच बाब आहे. माकडाचा माणूस झाला हे आम्हाला मान्य नाही असे एका प्रतिष्ठित मंत्र्यांनीच प्रसिद्ध केले. जर माकडाचा माणूस झाला असेल तर अजून माकड शिल्लक कसे असे प्रश्न विचारले. माकडामध्ये उत्क्रांती झाली नाही की झाली हे शोधण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. या सर्वांची शास्त्रीय पातळीवर चर्चा व्हावी व मराठीमध्ये याची उत्तरे मिळावीत यासाठी हे पुस्तक लिहीलेले आहे.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 1 Digest Class 10th Maharashtra Board - Guide: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड - मार्गदर्शन

by Shri Navneet

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे दहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे दहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Antarmanachi Shakti - Novel: अंतर्मनाची शक्ती - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. जोसेफ मर्फीलिखित द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रस्तुत मराठी आवृत्ती 2018 साली प्रथम प्रकाशित झाला. पुस्तकामध्ये लेखक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केलात, तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्रं मनात रंगवता त्यामुळं तुमचं भाग्य घडतं, भविष्याला आकार मिळत असतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणं विचार करतो, त्याप्रमाणंच तो बनतो. या गोष्टींचं तुम्हांला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.

Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Klesh Rahit Jeevan - Novel: क्लेश रहित जीवन - कादंबरी

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल. दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Manusaki - Novel: माणुसकी - कादंबरी

by Shri. Shripad Nagnath Rautwad

सामाजिक जीवनात हा मानव आईवडील सारख्या आपल्या मुख्य घटकांना देखील आज वृद्धाश्रमात सोडू लागला आहे, नातलग, गणगोत, आपुलकी, प्रेम, भावना, परोपकार, हे माणुसकीच्या घटकांना ठोकर देत हा मानव प्राणी आज या समाजात जीवन जगत आहे. त्यातच मानवांच्या निर्मितीचा गूढ असलेल्या निसर्गापासूनही हा मानव दूर झाला आहे. निसर्गाची कत्तल करू लागला. डिसीटल च्या दुनीयेत स्वतः डिजीटल झालाच, मात्र समाजालाही डिजीटल करत सुटला आहे. अश्या असंख्य मानवतेच्या पैलूंना माझ्या लेखणीतून स्पर्शून गेललेला हा 'माणुसकी' आपल्या हाती सोपवत आहे.

Mi Abhimanyu - Novel: मी अभिमन्यू - कादंबरी

by Satishkumar Patil

डॉ. सतिशकुमार पाटील लिखित मी अभिमन्यू या पुस्तकात मृत्यू समोर उभा असताना मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो. मृत्यू दारात उभा आहे तेव्हा त्या अभिमन्यूच्या मनात आलेले विचार, त्या विचारातून मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ याचे सुंदर मंथन हे सविस्तर कांदबरीमध्ये दाखवले आहे.

Mrutyunjayee - Novel: मृत्युंज़यी - कादंबरी

by Ratnakar Matkari

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्‍याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्‍या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.

Prarthana Upchar - Novel: प्रार्थना उपचार - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. मर्फी यांनी हे पुस्तक लिहिले आहे वाचकांना समजावून सांगण्यासाठी की ते त्यांच्या चांगल्या स्त्रोताचा स्रोत कसा प्राप्त करू शकतील आणि योग्य प्रार्थनेद्वारे इच्छित परिणाम मिळवू शकतील. प्रार्थना कशी करावी, रोजच्या कामाचा भाग म्हणून प्रार्थना कशी ठेवावी, आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका इत्यादी प्रार्थना कशी वापरायच्या हे नियतकालिक आहे. मर्फीच्या म्हणण्यानुसार, प्रार्थनेत अडचणीच्या वेळी नेहमीच मदत असते, परंतु प्रार्थनेला आपल्या जीवनातील अविभाज्य आणि रचनात्मक भाग बनविण्यास त्रास मिळण्याची गरज नाही.

RAW Bhartiya Guptacharsansthechi Goodhgatha - Novel: रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा - कादंबरी

by Ravi Amale

‘रॉ’___ रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ’ची अशी कहाणी. बांग्लादेश मुक्तियुद्धाची आणि पाकीस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवयांना पुरुन उरण्याची. ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरुन चालत असतात ही बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तिथे नैतिक-अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘रॉ’च्या अनेक ज्ञान-अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गुढ अंतरंगाचे.

Brahmand Ani Eshwar - Novel: ब्रह्मांड आणि ईश्वर - कादंबरी

by Shri. Dr. A. P. Dhande

ब्रह्मांड आणि ईश्वर या पुस्तकात समजलेले ब्रह्मांड आणि ईश्वर या संबंधी विज्ञान व तत्वज्ञान यांची सांगड घालून लेखकाने काही विचार प्रस्तुत केले आहे. या पुस्तकामध्ये विश्वाची माहिती दिलेली आहे. हिंदू संस्कृतीनुसार ब्रम्हदेवाने शुन्यातून विश्वनिर्मिती कशी केली, ब्रम्हदेव विश्वाच्या पूर्वी होते का नही, विश्वाची निर्मिती कशी झाली याची माहिती चित्राद्वारे दाखवली आहे.

Chetkin - Novel: चेटकीण - कादंबरी

by Narayan Dharap

गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित "चेटकीण' ही कादंबरी. अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणाऱ्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

Refine Search

Showing 51 through 75 of 112 results