Browse Results

Showing 101 through 112 of 112 results

Shoonyatun Suryakade - Novel: शून्यातून ‘सूर्या’कडे - कादंबरी

by Arati Datar

प्राचीन भारतातील कालखंडांवर, व्यक्तिमत्त्वांवर आधारित कादंबऱ्या-पुस्तके, अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, सकारात्मक विषय, मनाला उभारी देणारी पुस्तकं प्रकाशित करण्याची आमच्या 'विहंग प्रकाशन संस्थे'ची परंपरा आहे. डॉ. आरती दातार लिखित 'शून्याकडून सूर्याकडे' हे आमच्या परंपरेत बसणारं असंच एक पुस्तक. विपरीत परिस्थितीविरुद्ध यशस्वी लढा देऊन डॉ. अरुण दातारांनी जे विजिगीषू वृत्तीचं दर्शन घडवलं आहे त्याचं साद्यंत वर्णन प्रस्तुत पुस्तकात आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ऐन तिशीच्या उंबरठ्यावर झालेल्या अपघातात डॉ. अरुण यांचा एक पाय पूर्णत: जायबंदी झाला. त्यानंतर त्यांच्यावर झालेले उपचार, वाट्याला आलेला आशा-निराशेचा खेळ, चाळीस टक्के संभाव्य राहणारी शारीरिक असमर्थता, विपरित परिस्थितीशी झगडताना आलेले कडुगोड अनुभव आणि या सर्वांवर समर्थपणानं मात करून आयुष्यात पुन्हा उभे राहिलेले डॉ. अरुण आणि डॉ. आरती दातार यांच्या विषयीचा सारा लेखाजोखा या पुस्तकात स्वत: डॉ. आरती दातार यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या उभयतांनी प्राप्त परिस्थिती आनंदानं स्वीकारली. संकटाशी सामना करून मार्ग काढला; आणि आज ते दोघे आपापल्या क्षेत्रात मोठ्या धडाडीनं उभे राहिले, यशस्वी झाले.

Shriman Yogi - Novel: श्रीमान योगी - कादंबरी

by Ranjit Desai

रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्‌मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्‍यांचा वापर केला आहे. भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजनीतिज्ञ, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.

Sita Mithilechi Yoddha - Novel: सीता मिथिलाचे वॉरियर - कादंबरी

by Amish Tripathi

सीता: मिथिलाचे वॉरियर ऑफ मिथिला हे भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचे एक काल्पनिक पुस्तक आहे जे 29 मे 2017 रोजी प्रसिद्ध झाले होते. हे राम चंद्र मालिकेचे दुसरे पुस्तक आहे. मालिका ही रामायण ही भारतातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्य आहे. मालिकेतील प्रत्येक पुस्तक रामायणातील एका महत्त्वपूर्ण पात्रावर केंद्रित आहे. सीताः मिथिलाचा योद्धा सीतेच्या कथेवर लक्ष केंद्रित करतो. हे पुस्तक लक्ष्मीचे अवतार मानल्या जाणार्‍या कल्पित भारतीय राणी सीतेवर आधारित आहे. हे शीर्षक त्याच्या फेसबुक पेजवर लेखकाने उघड केले. मिथिलाचा राजा जनक या कथेतून एक मुलगी शेतात सोडलेली आढळली. लांडग्यांच्या पॅकमधून गिधाडचे तिचे रहस्यमयपणे संरक्षण केले जाते. राजा जनक तिला दत्तक घेतात पण राजा रावणच्या राक्षसासारख्या वासनांपासून भारताच्या दैवी भूमीच्या रक्षणासाठी ही अनाथ मुलगीच असेल याची त्यांना आश्चर्य वाटली नव्हती. सीतेचे बालपण आणि शिकार, तिचे रामसोबतचे लग्न आणि शेवटी तिचा 14 वर्षांचा वनवास, तिचा पती राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्यासह होते.

Suryaputra Lokmanya - Novel: सूर्यपुत्र लोकमान्य - कादंबरी

by Smita Damle

लोलकातून (प्रिझम् मधून) सूर्यकिरणं आरपार गेली की त्यातले सप्तरंग उजळून निघतात. कै.सदाशिव विनायक बापट यांच्या लोकमान्य टिळकांच्या ‘आठवणी आणि आख्यायिका' या दोन खंडांचंही तसंच आहे. स. वि. बापटांनी चिवटपणे, अफाट मेहनत घेऊन ह्या आठवणींच्या रूपाने लोकमान्यांना आपल्यासमोर कायमचं जिवंत केलं. त्याचाच आढावा घेत ही कांदबरी डॉ. स्मिता दामले यांनी वाचकांसमोर आणली आहे.

Tattvadnyan class 11 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तत्त्वज्ञानाच्या जगभरात असलेल्या वेगवेगळ्या परंपरांपैकी भारतीय आणि पाश्चात्य या दोन परंपरांची ओळख करून दिलेली आहे. यामधून तत्त्वज्ञानाचा संस्कृतीशी, ऐतिहासिक कालखंडांशी कसा संबंध असतो हे स्पष्ट केलेले आहे. पुस्तकामध्ये पाठांतरापेक्षा आकलन आणि उपयोजन यांच्यावर भर देण्याच्या हेतूने स्वाध्याय, आणि उपक्रमांची रचना केली आहे. पुस्तकातील विषयांशी संबंधित माहिती इतर स्रोतांमधून शोधणे, तिची योग्य मांडणी करता येणे, संवाद-चर्चा, लेखन आणि इतर सृजनशील पद्धतींनी आपले विचार व्यक्त करता येणे, त्याचबरोबर केवळ लेखन-वाचन या रूढ पद्धतीच नव्हे, तर प्रत्यक्ष निरीक्षण, चित्रे बघणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे या प्रकारेही तत्त्वज्ञान शिकवले गेलेले आहे.

Tatvagyaan class 12 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सात प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतीमीमांसा या तीन शाखांमधील प्रमुख संकल्पना आणि सिद्धांत यांची थोडी सविस्तर ओळख करून त्याचबरोबर सौंदर्यमीमांसा या शाखेचाही परिचय करून दिला आहे. या पुस्तकाच्या अभ्यासाने तुमचे तत्त्वज्ञानाबद्दलचे कुतूहल काहीसे शमले, तरी विषयाचा अधिक सखोल आणि सांगोपांग अभ्यास करण्याची तुम्हाला इच्छा होईल, याची खात्री आहे.

Utkranticha Rahasyabhed - Novel: उत्क्रांतीचा रहस्यभेद - कादंबरी

by Mohan Madwanna

आपण कोठून आलो? आपले काय होणार? आणि या पृथ्वीवर असलेल्या सजीवांशी आपला संबंध काय? या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न मानवाने पिढ्यांनापिढ्या केला आहे. भारतापुरता विचार करायचा तर तत्वज्ञांनी याचे उत्तर फक्त एका वाक्यात देऊन ठेवले आहे अनादि अनंत काळापासून हे असेच चालले आहे. मानव आहे तसाच आहे. यानंतर मानवाचा ईश्वर होणार. मुक्ती मिळणार. जिवाची शिवाशी भेट. मृत्यूनंतर पुन्हा चौऱ्या ऐंशी लक्ष योनीतून फेऱ्या. त्यानंतर मानवी जन्म वगैरे. आपल्या कर्मानुसार गती मिळणार स्वर्ग, नरक, पाताळ लोक, पिशाच्च योनी. ज्याला जे वाटले त्याप्रमाणे त्याने सांगितले. ज्यांनी विश्वास ठेवायाचा त्यांनी ठेवला. यातील कोणतीही बाब वैज्ञानिक रीत्या सिद्ध करण्याची आवश्यकता आहे असे कधी वाटलेच नाही. उत्क्रांती ही अशीच बाब आहे. माकडाचा माणूस झाला हे आम्हाला मान्य नाही असे एका प्रतिष्ठित मंत्र्यांनीच प्रसिद्ध केले. जर माकडाचा माणूस झाला असेल तर अजून माकड शिल्लक कसे असे प्रश्न विचारले. माकडामध्ये उत्क्रांती झाली नाही की झाली हे शोधण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. या सर्वांची शास्त्रीय पातळीवर चर्चा व्हावी व मराठीमध्ये याची उत्तरे मिळावीत यासाठी हे पुस्तक लिहीलेले आहे.

Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) MAR 210 S.Y.B.A. Y.C.M.O.U

by Rajan Gavas Dr Mangala Warkhede Dr Dilip Dhondage

MAR 210 Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 1 Digest Class 10th Maharashtra Board - Guide: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड - मार्गदर्शन

by Shri Navneet

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे दहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे दहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Yayati - Novel: ययाति - कादंबरी

by V. S. Khandekar

एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ 'ययाति'च्या रूपाने लेखकांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

Yugandhar - Novel: युगंधर - कादंबरी

by Shivaji Sawant

हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे.भारतीय समाज व संस्कॄती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमदभागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या काही वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूस-नीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तावापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.! त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती - ‘युगंधर’!!

Refine Search

Showing 101 through 112 of 112 results