Browse Results

Showing 51 through 75 of 112 results

Marathi Balbharti class 6 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या भावविश्‍वातील पाठ व कवितांचा समावेश पाठ्यपुस्तकात केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी, सारे हसूया, वाचा, ओळखा पाहू, विचार करून सांगूया, भाषेची गंमत पाहूया' या शीर्षकांखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यांस वाव दिला आहे. 'आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली व्याकरण घटकांची सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे.

Manus Mhanun Jaganyasathi - Novel: माणूस म्हणून जगण्यासाठी - कादंबरी

by Vivek Pandit

माणूस म्हणून जगण्यासाठी हे पुस्तक स्वातंत्र्य, असंघटितांची संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून दुर्बलांना सामर्थ्यवान बनविण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. विकासाची नेमकी व्याख्या समजून घेतल्याशिवाय या प्रक्रियेचे आकलन होणार नाही. रस्ते, पूल, उड्डाणपूल, गगनचुंबी इमारती, दूरसंचार व संपर्काची साधने, वीज निर्मितीचे नेत्रदीपक प्रकल्प, गोल्फ क्लब, झगझगते मॉल्स, विशेष आर्थिक क्षेत्र यावर विकास तोलला असता भ्रामक चित्र उभे राहते. स्थिरावलेल्या पारंपरिक अर्थव्यवस्थेला धक्के देत आधुनिक अर्थव्यवस्था गती घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते, यात शंका नाही. खरा विकास या प्रगतीच्या पलीकडे व अधिक मूलभूत असतो. अन्न, आरोग्य, शिक्षण, पाणी, लसीकरण, पोषण, स्वच्छता, वीज या पलीकडे मानवी मनाचा स्वातंत्र्य व सहजतेच्या वातावरणात झालेला विकास म्हणजेच खरा विकास होय. अन्याय-अत्याचाराला मूक संमती असणे, शोषणासमोर गुडघे टेकणे, यथास्थिती मान्य करणे, गुलामीचे जिणे निमूटपणे स्वीकारणे, या व अशा शांततेच्या संस्कृतीचे परिवर्तन हाच विकासाचा मार्ग आहे.

Doctor Chanakya - Novel: डॉक्टर चाणक्य - कादंबरी

by Shashank Parulekar

डॉ. शशांक परुळेकर लिखित डॉक्टर चाणक्य या पुस्तकामध्ये लेखकांनी आपला वैद्यकीय क्षेत्राबाबत चा पालकांचा व मुलांचा जो दृष्टीकोन आहे तो कसा असावा व स्वतःचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव लेखकाने याद्वारे सांगितला आहे.

Rahu De Gharate - Novel: राहू दे घरटे - कादंबरी

by Shubhangi Paseband

शुभांगी पासेबंद लिखित राहू दे घरटे या पुस्तकामध्ये महिलांचे प्रश्न, मुलींची दुर्दशा, स्त्री भ्रूणहत्या त्यावर उपाय दाखवायचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. एखाद्या स्त्री ने समाजात न घाबरता स्वतःच्या हिमतीवर आपले वेगळे स्थान कसे निर्माण करावे हे या कादंबरीत सविस्तर पणे सांगितलेले आहे. प्रस्तुत कादंबरीतली नायिका, आईची लाडकी लेक, लेखिकेने तिच्या गुणवत्तेतून, निरीक्षणातून रेखाटल्याचं जाणवतं. भोगवादाचा उच्छाद आजही स्त्रीच्या माथी मारला जातोय. कुटुंबातलं विस्कटलेपण आणि नात्या-नात्यातली बेबनावगिरी या कहाणीत दिसून येते. एकीकडे समाजात स्त्रियांच्या कर्तबगारीचे ढोल बडवले जातात असं चित्र आहे; तर दुसरीकडे स्त्री कितीही प्रगल्भ, विचारशील असली तरी तिचा मानसिक, शारीरिक छळ व शोषण अव्याहतपणे सुरूच आहे.

Mi Abhimanyu - Novel: मी अभिमन्यू - कादंबरी

by Satishkumar Patil

डॉ. सतिशकुमार पाटील लिखित मी अभिमन्यू या पुस्तकात मृत्यू समोर उभा असताना मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो. मृत्यू दारात उभा आहे तेव्हा त्या अभिमन्यूच्या मनात आलेले विचार, त्या विचारातून मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ याचे सुंदर मंथन हे सविस्तर कांदबरीमध्ये दाखवले आहे.

Samanya Vigyan class 7 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

सामान्य विज्ञान इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. विज्ञानाच्या या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू “समजून घ्या व इतराना समजवा” हा आहे. 'निरोक्षण व चर्चा करा', 'जरा डोके चालवा', 'शाधा पाहू', 'विचार करा' अशा अनेक कृतीतून तुम्ही विज्ञान शिकणार आहात. या सर्व कृतीमध्ये भाग घ्या. थोडे आठवा', 'सागा पाहू' या कृतींचा उपयाग उजळणीसाठी करा. पाठ्यपुस्तकात 'करून पहा', 'करून पाहूया' अशा अनेक कृताचा आणि प्रयागाचा समावेश केलेला आहे. या विविध कृती, प्रयाग, निरीक्षणे तुम्ही स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच आवश्यक तेथे तुमच्या शिक्षकांची, पालकांची व वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. पाठांमध्ये काही ठिकाणी तुम्हांला माहिती शोधावी लागल, तो शोधण्यासाठी ग्रंथालय, तत्रज्ञान जस इंटरनेट याचीही मदत घ्या.

Ganit class 7 - Maharashtra Board: गणित इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकात काही कृती व रचना दिल्या आहेत त्या जरूर करून पाहा. त्यामधून काही गंमत, नवे गुणधर्म लक्षात येतात का ते पाहा. आपापसात चर्चा करून नवे मुद्दे समजू शकतात. चित्रे, वेन आकृत्या व इंटरनेटच्या साहाय्याने गणित समजणे सोपे होते. हे मुद्दे नीट समजले तर गणित मुळीच अवघड नाही. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रकरण तुम्ही नीट लक्ष देऊन वाचावे अशी अपेक्षा आहे. गणित सोडवण्याची रीत तसेच त्याचे सूत्र का व कसे तयार झाले याचे स्पष्टीकरण या पुस्तकात दिले आहे. त्या रीती वापरून उदाहरणे सोडवण्याचा सराव करा. तो महत्त्वाचा आहे. सरावसंचात दिलेल्या उदाहरणासारखी जास्तीची उदाहरणे तुम्हीही तयार करा. अधिक आव्हानात्मक उदाहरणे या पाठ्यपुस्तकात तारांकित करून दिली आहेत.

Sharad Pawar Power Niti - Novel: शरद पवार पॉवर नीती - कादंबरी

by Yashraj Parkhi

पद्मविभूषणाने सन्मानीत, राजकारणातील द्रोणाचार्य, मा. कृषीमंत्री, मा. संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आणि जनतेच्या मनातले पंतप्रधान, अद्भुत स्मरणशक्तीचे बादशाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र गोविंदराव पवार; ह्यांच्या जीवनावर व त्यांच्या जीवनाचे सिद्धांत, तत्वे, कार्यप्रणाली, नीती ह्यावर आधारित हे पुस्तक आपणास सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, शरद पवार पॉवर नीती हे पुस्तक तुमच्या यशस्वी जीवनाची नीती ठरवण्यासाठी देखील सहकार्य करेल. शरद पवार साहेबांचे सर्वच पैलू ह्या पुस्तकात मांडले आहेत. शरद पवार ह्यांची अनेक रहस्ये ह्या पुस्तकात पुंजगती भौतिकशास्त्राच्या आधारे मांडली आहेत.

Nyay - Novel: न्याय - कादंबरी

by Jagdish Khandewale

हजार लोकांची सभा आठ दहा जण उधळून लावू शकतात. खरे म्हणजे जमलेल्या लोकांचा नुसत्या हुंकाराने हे गर्भगळीत होऊ शकतात पण ते तसे करीत नाही म्हणूनच यांचे फावते. पगारवाढ आणि सवलती करता जागृत असण्याऱ्या संघटना, संस्थेतील गैरकारभाराबद्दल मौन बाळगून असतात. कोणी एकट्याने याविरोधात आवाज उठविल्यास त्याला गप्प करण्यात येते. गप्प झालाच नाही तर त्यालाच आरोपी ठरविण्यात येते आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठविण्यात येते. दुर्जन व्यक्ती फार बुद्धिमान असतात असे काही नसते. सज्जन माणसे चाकोरी बाहेर वागत नाहीत, असंघटित असतात याचा गैरफायदा दुर्जनांना मिळतो एवढेच. अशाच व्यवस्थेचा एक बळी, नरेन. संधी एकदाच दार ठोठावते असे म्हणतात. नरेनने या संधीचा पूर्ण फायदा घेतला पण ते तेवढे सोपे नव्हते. ही वास्तवाशी जवळिक साधणारी, मनोरंजक आणि विषयांचे वैविध्य राखणारी कथा आहे.

Shoonyatun Suryakade - Novel: शून्यातून ‘सूर्या’कडे - कादंबरी

by Arati Datar

प्राचीन भारतातील कालखंडांवर, व्यक्तिमत्त्वांवर आधारित कादंबऱ्या-पुस्तके, अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, सकारात्मक विषय, मनाला उभारी देणारी पुस्तकं प्रकाशित करण्याची आमच्या 'विहंग प्रकाशन संस्थे'ची परंपरा आहे. डॉ. आरती दातार लिखित 'शून्याकडून सूर्याकडे' हे आमच्या परंपरेत बसणारं असंच एक पुस्तक. विपरीत परिस्थितीविरुद्ध यशस्वी लढा देऊन डॉ. अरुण दातारांनी जे विजिगीषू वृत्तीचं दर्शन घडवलं आहे त्याचं साद्यंत वर्णन प्रस्तुत पुस्तकात आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ऐन तिशीच्या उंबरठ्यावर झालेल्या अपघातात डॉ. अरुण यांचा एक पाय पूर्णत: जायबंदी झाला. त्यानंतर त्यांच्यावर झालेले उपचार, वाट्याला आलेला आशा-निराशेचा खेळ, चाळीस टक्के संभाव्य राहणारी शारीरिक असमर्थता, विपरित परिस्थितीशी झगडताना आलेले कडुगोड अनुभव आणि या सर्वांवर समर्थपणानं मात करून आयुष्यात पुन्हा उभे राहिलेले डॉ. अरुण आणि डॉ. आरती दातार यांच्या विषयीचा सारा लेखाजोखा या पुस्तकात स्वत: डॉ. आरती दातार यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या उभयतांनी प्राप्त परिस्थिती आनंदानं स्वीकारली. संकटाशी सामना करून मार्ग काढला; आणि आज ते दोघे आपापल्या क्षेत्रात मोठ्या धडाडीनं उभे राहिले, यशस्वी झाले.

Bhagavan Buddha Aani Tyancha Dhamma - Novel: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म - कादंबरी

by B. R. Ambedkar

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला. या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हणता येईल. या विशाल ग्रंथात बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये, लेखकाने चार प्रश्नांची सूची दिली आहे.

Jhunj Sangharsh Jivanacha - Novel: झुंज संघर्ष जीवनाचा - कादंबरी

by Govind Gadhari

लेखकाच्या स्वत:च्या जीवनातील सत्य घटीत घटनांवरील हे लिखाण आहे. दुर्गम भागात रानोमाळ भटकंती करणाऱ्या असंघटित समाजातील एका दुर्बल आणि दुबळ्या कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीच्या जीवनात बालपणापासून ज्या संकटमय घटना घडल्या त्या त्याने अनुभवल्या व त्यांना ते कस कसे सामोरे गेले आणि त्यात त्यांनी अनुभवलेली, झेललेली संकटे व त्यावर कशी मात केली त्याचे त्यांनी गावरान मराठी भाषेत कथन केले आहे. प्रदीर्घ काळापर्यंतची त्यांची सत्य घटनांवर आधारीत अशी ही झुंज आहे.

Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी

by Ulhas Hari Joshi

आपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.

Utkranticha Rahasyabhed - Novel: उत्क्रांतीचा रहस्यभेद - कादंबरी

by Mohan Madwanna

आपण कोठून आलो? आपले काय होणार? आणि या पृथ्वीवर असलेल्या सजीवांशी आपला संबंध काय? या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न मानवाने पिढ्यांनापिढ्या केला आहे. भारतापुरता विचार करायचा तर तत्वज्ञांनी याचे उत्तर फक्त एका वाक्यात देऊन ठेवले आहे अनादि अनंत काळापासून हे असेच चालले आहे. मानव आहे तसाच आहे. यानंतर मानवाचा ईश्वर होणार. मुक्ती मिळणार. जिवाची शिवाशी भेट. मृत्यूनंतर पुन्हा चौऱ्या ऐंशी लक्ष योनीतून फेऱ्या. त्यानंतर मानवी जन्म वगैरे. आपल्या कर्मानुसार गती मिळणार स्वर्ग, नरक, पाताळ लोक, पिशाच्च योनी. ज्याला जे वाटले त्याप्रमाणे त्याने सांगितले. ज्यांनी विश्वास ठेवायाचा त्यांनी ठेवला. यातील कोणतीही बाब वैज्ञानिक रीत्या सिद्ध करण्याची आवश्यकता आहे असे कधी वाटलेच नाही. उत्क्रांती ही अशीच बाब आहे. माकडाचा माणूस झाला हे आम्हाला मान्य नाही असे एका प्रतिष्ठित मंत्र्यांनीच प्रसिद्ध केले. जर माकडाचा माणूस झाला असेल तर अजून माकड शिल्लक कसे असे प्रश्न विचारले. माकडामध्ये उत्क्रांती झाली नाही की झाली हे शोधण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही. या सर्वांची शास्त्रीय पातळीवर चर्चा व्हावी व मराठीमध्ये याची उत्तरे मिळावीत यासाठी हे पुस्तक लिहीलेले आहे.

Tatvagyaan class 12 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

तत्त्वज्ञान इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सात प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सत्तामीमांसा, ज्ञानमीमांसा आणि नीतीमीमांसा या तीन शाखांमधील प्रमुख संकल्पना आणि सिद्धांत यांची थोडी सविस्तर ओळख करून त्याचबरोबर सौंदर्यमीमांसा या शाखेचाही परिचय करून दिला आहे. या पुस्तकाच्या अभ्यासाने तुमचे तत्त्वज्ञानाबद्दलचे कुतूहल काहीसे शमले, तरी विषयाचा अधिक सखोल आणि सांगोपांग अभ्यास करण्याची तुम्हाला इच्छा होईल, याची खात्री आहे.

Bhugol class 7 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

भूगोल इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाश, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते, इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत.

Itihas va Nagrikshstra class 7 - Maharashtra Board: इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इतिहासामध्ये तेरा व नागरिकशास्त्रामध्ये सहा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात इतिहासाच्या भागात 'मध्ययुगीन भारताचा इतिहास दिलेला आहे. मध्ययुगीन भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे स्थान व भूमिका केंद्रस्थानी ठेवून पाठ्यपुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे. नागरिकशास्त्राच्या भागात भारतीय संविधानाची ओळख करून देण्यात आली आहे. भारताच्या संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, संविधानाची उद्देशिका, संविधानातील मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व हा आशय मांडण्यात आला आहे.

Abhimanachi Leni - Novel: अभिमानाची लेणी - कादंबरी

by Devendra Bhujbal

देवेंद्र भुजबळ यांनी 'अभिमानाची लेणी' या पुस्तकात सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच 'राष्ट्रभक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सानेगुरुजींची शाळा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, बुद्ध वंदन, युगप्रवर्तक शाहू महाराज, उत्तम बंडू तुपे अशा महनीय व्यक्तिंची विविध क्षेत्रातील कामगिरीची माहिती वाचकांसमोर मांडली आहे.

Amrutbindu - Novel: अमृतबिंदू - कादंबरी

by Ravindra Fadake

रवींद्र फडके लिखित अमृतबिंदू या पुस्तकामध्ये संत तुकाराम महाराज यांचे अभंग व त्याचे अर्थ आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांमधे विविध भावनांचे आविष्करण आढळते, जसे पांडुरंगाबद्दल उत्कट प्रेम, वैराग्य,भक्ती, महाराजांचे विविध अनुभव ईत्यादी. तसेच अभगांमधे अध्यात्माचे विविध पैलू उदाहरणार्थ विविध भक्तीमार्ग, भगवंताच्या भेटिसाठी आवश्यक असणारे प्रेम, वैराग्य, श्रद्धा ईत्यादी भाव; मुख्यत: नामस्मरण हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Manusmruti - Novel: मनुस्मृति - कादंबरी

by Shri. Ashok Kothare

अशोक कोठारे लिखित मनुस्मृति या पुस्तकामध्ये मुनुस्मृती चे भाषांतर मराठी भाषेत केले असून त्यांनी या पुस्तकामध्ये चार वर्ण सांगितलेले आहेत त्यामध्ये ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ दाखवला आहे व चार वर्णांचे नियम व रूढी परंपरा त्यामध्ये आहेत. यामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण सांगितले आहेत.

Parisar Abhyas Bhag 1 class 5 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पंचवीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे व नकाशे दिले आहेत. या पाठ्यपुस्तकात ‘सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', 'वाचा व विचार करा', अशा शीर्षकांखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांत विविधता आणली आहे. या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होणार आहे.

Apan Ase Ghadalo Parisar Abhyas Bhag 2 class 5 - Maharashtra Board: आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग २ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड.

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग २ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात दहा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. इतिहास म्हणजे एक शास्त्र आहे, याची जाणीव प्रथमपासूनच मुलांच्या मनात रुजावी अशा पद्धतीने या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. आदिमानव ते आधुनिक मानव ही वाटचाल समजून घेता घेता, त्या वाटचालीत निसर्ग आणि परिसर या दोन घटकांचे अत्यंत महत्त्व आहे. मानवाने त्याच्या गरजेप्रमाणे साधनांची निर्मिती केली. हवामानातील बदलानुसार त्याच्या भोवतीचा परिसर बदलला. त्यामुळे त्याच्या गरजा आणि त्यांना अनुसरून त्याच्या कामांचे स्वरूप बदलले. म्हणून त्याने तयार केलेल्या साधनांचे स्वरूपही बदलत गेले. 'प्रगत बुद्धीच्या मानवाने' गाठलेला नागरी संस्कृतीचा टप्पा हा प्रागैतिहासिक काळाचा परमोच्च बिंदू. येथून ऐतिहासिक काळाची सुरुवात होते. अशा प्रकारे मानवाच्या वाटचालीची माहिती या पुस्तकातून दिलेली आहे.

Marathi Balbharati class 5 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पाठ व कविता मिळून संत्तावीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठपुस्तकात विद्यार्थ्यांना घर व परिसरातील व्यक्तींशी घटना-प्रसंगानुरूप बोलता यावे, स्वच्छता, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांवर विचार करायला ते प्रवृत्त व्हावे, यासाठी पाठ्यपुस्तकांत प्रसंगचित्रे दिली आहेत. चित्रांचे निरीक्षण, त्यांवर विचार, चर्चा व त्यासंबंधी स्वतःचे अनुभवकथन यांतून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती निर्माण होईल. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, खेळ खेळूया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी' या शीर्षकाखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव दिला आहे.

Brahmand Ani Eshwar - Novel: ब्रह्मांड आणि ईश्वर - कादंबरी

by Shri. Dr. A. P. Dhande

ब्रह्मांड आणि ईश्वर या पुस्तकात समजलेले ब्रह्मांड आणि ईश्वर या संबंधी विज्ञान व तत्वज्ञान यांची सांगड घालून लेखकाने काही विचार प्रस्तुत केले आहे. या पुस्तकामध्ये विश्वाची माहिती दिलेली आहे. हिंदू संस्कृतीनुसार ब्रम्हदेवाने शुन्यातून विश्वनिर्मिती कशी केली, ब्रम्हदेव विश्वाच्या पूर्वी होते का नही, विश्वाची निर्मिती कशी झाली याची माहिती चित्राद्वारे दाखवली आहे.

Pharmacist Tumchya Arogyasathi - Novel: फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी - कादंबरी

by Shri. Ashish Karle

अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे. आरोग्याशी संदर्भात सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्वपूर्ण असतात आणि या सेवा पुरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचा कधी न कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच अगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गरजांपर्यंत__ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शननुसार) औषध वितरित (डिस्पेन्स) करणं एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते. दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू आहेत. फार्मासिस्टच्या अशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे फार्मासिस्ट आणि काय आहे त्याची भूमिका तुमच्या आरोग्यसंदर्भात__

Refine Search

Showing 51 through 75 of 112 results