Browse Results

Showing 51 through 75 of 115 results

Jhunj Sangharsh Jivanacha - Novel: झुंज संघर्ष जीवनाचा - कादंबरी

by Govind Gadhari

लेखकाच्या स्वत:च्या जीवनातील सत्य घटीत घटनांवरील हे लिखाण आहे. दुर्गम भागात रानोमाळ भटकंती करणाऱ्या असंघटित समाजातील एका दुर्बल आणि दुबळ्या कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीच्या जीवनात बालपणापासून ज्या संकटमय घटना घडल्या त्या त्याने अनुभवल्या व त्यांना ते कस कसे सामोरे गेले आणि त्यात त्यांनी अनुभवलेली, झेललेली संकटे व त्यावर कशी मात केली त्याचे त्यांनी गावरान मराठी भाषेत कथन केले आहे. प्रदीर्घ काळापर्यंतची त्यांची सत्य घटनांवर आधारीत अशी ही झुंज आहे.

Bhagavan Buddha Aani Tyancha Dhamma - Novel: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म - कादंबरी

by B. R. Ambedkar

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला. या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हणता येईल. या विशाल ग्रंथात बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये, लेखकाने चार प्रश्नांची सूची दिली आहे.

Shoonyatun Suryakade - Novel: शून्यातून ‘सूर्या’कडे - कादंबरी

by Arati Datar

प्राचीन भारतातील कालखंडांवर, व्यक्तिमत्त्वांवर आधारित कादंबऱ्या-पुस्तके, अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, सकारात्मक विषय, मनाला उभारी देणारी पुस्तकं प्रकाशित करण्याची आमच्या 'विहंग प्रकाशन संस्थे'ची परंपरा आहे. डॉ. आरती दातार लिखित 'शून्याकडून सूर्याकडे' हे आमच्या परंपरेत बसणारं असंच एक पुस्तक. विपरीत परिस्थितीविरुद्ध यशस्वी लढा देऊन डॉ. अरुण दातारांनी जे विजिगीषू वृत्तीचं दर्शन घडवलं आहे त्याचं साद्यंत वर्णन प्रस्तुत पुस्तकात आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ऐन तिशीच्या उंबरठ्यावर झालेल्या अपघातात डॉ. अरुण यांचा एक पाय पूर्णत: जायबंदी झाला. त्यानंतर त्यांच्यावर झालेले उपचार, वाट्याला आलेला आशा-निराशेचा खेळ, चाळीस टक्के संभाव्य राहणारी शारीरिक असमर्थता, विपरित परिस्थितीशी झगडताना आलेले कडुगोड अनुभव आणि या सर्वांवर समर्थपणानं मात करून आयुष्यात पुन्हा उभे राहिलेले डॉ. अरुण आणि डॉ. आरती दातार यांच्या विषयीचा सारा लेखाजोखा या पुस्तकात स्वत: डॉ. आरती दातार यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या उभयतांनी प्राप्त परिस्थिती आनंदानं स्वीकारली. संकटाशी सामना करून मार्ग काढला; आणि आज ते दोघे आपापल्या क्षेत्रात मोठ्या धडाडीनं उभे राहिले, यशस्वी झाले.

Nyay - Novel: न्याय - कादंबरी

by Jagdish Khandewale

हजार लोकांची सभा आठ दहा जण उधळून लावू शकतात. खरे म्हणजे जमलेल्या लोकांचा नुसत्या हुंकाराने हे गर्भगळीत होऊ शकतात पण ते तसे करीत नाही म्हणूनच यांचे फावते. पगारवाढ आणि सवलती करता जागृत असण्याऱ्या संघटना, संस्थेतील गैरकारभाराबद्दल मौन बाळगून असतात. कोणी एकट्याने याविरोधात आवाज उठविल्यास त्याला गप्प करण्यात येते. गप्प झालाच नाही तर त्यालाच आरोपी ठरविण्यात येते आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठविण्यात येते. दुर्जन व्यक्ती फार बुद्धिमान असतात असे काही नसते. सज्जन माणसे चाकोरी बाहेर वागत नाहीत, असंघटित असतात याचा गैरफायदा दुर्जनांना मिळतो एवढेच. अशाच व्यवस्थेचा एक बळी, नरेन. संधी एकदाच दार ठोठावते असे म्हणतात. नरेनने या संधीचा पूर्ण फायदा घेतला पण ते तेवढे सोपे नव्हते. ही वास्तवाशी जवळिक साधणारी, मनोरंजक आणि विषयांचे वैविध्य राखणारी कथा आहे.

Sharad Pawar Power Niti - Novel: शरद पवार पॉवर नीती - कादंबरी

by Yashraj Parkhi

पद्मविभूषणाने सन्मानीत, राजकारणातील द्रोणाचार्य, मा. कृषीमंत्री, मा. संरक्षण मंत्री, महाराष्ट्राचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आणि जनतेच्या मनातले पंतप्रधान, अद्भुत स्मरणशक्तीचे बादशाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र गोविंदराव पवार; ह्यांच्या जीवनावर व त्यांच्या जीवनाचे सिद्धांत, तत्वे, कार्यप्रणाली, नीती ह्यावर आधारित हे पुस्तक आपणास सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, शरद पवार पॉवर नीती हे पुस्तक तुमच्या यशस्वी जीवनाची नीती ठरवण्यासाठी देखील सहकार्य करेल. शरद पवार साहेबांचे सर्वच पैलू ह्या पुस्तकात मांडले आहेत. शरद पवार ह्यांची अनेक रहस्ये ह्या पुस्तकात पुंजगती भौतिकशास्त्राच्या आधारे मांडली आहेत.

Ganit class 7 - Maharashtra Board: गणित इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकात काही कृती व रचना दिल्या आहेत त्या जरूर करून पाहा. त्यामधून काही गंमत, नवे गुणधर्म लक्षात येतात का ते पाहा. आपापसात चर्चा करून नवे मुद्दे समजू शकतात. चित्रे, वेन आकृत्या व इंटरनेटच्या साहाय्याने गणित समजणे सोपे होते. हे मुद्दे नीट समजले तर गणित मुळीच अवघड नाही. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रकरण तुम्ही नीट लक्ष देऊन वाचावे अशी अपेक्षा आहे. गणित सोडवण्याची रीत तसेच त्याचे सूत्र का व कसे तयार झाले याचे स्पष्टीकरण या पुस्तकात दिले आहे. त्या रीती वापरून उदाहरणे सोडवण्याचा सराव करा. तो महत्त्वाचा आहे. सरावसंचात दिलेल्या उदाहरणासारखी जास्तीची उदाहरणे तुम्हीही तयार करा. अधिक आव्हानात्मक उदाहरणे या पाठ्यपुस्तकात तारांकित करून दिली आहेत.

Samanya Vigyan class 7 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

सामान्य विज्ञान इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. विज्ञानाच्या या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतू “समजून घ्या व इतराना समजवा” हा आहे. 'निरोक्षण व चर्चा करा', 'जरा डोके चालवा', 'शाधा पाहू', 'विचार करा' अशा अनेक कृतीतून तुम्ही विज्ञान शिकणार आहात. या सर्व कृतीमध्ये भाग घ्या. थोडे आठवा', 'सागा पाहू' या कृतींचा उपयाग उजळणीसाठी करा. पाठ्यपुस्तकात 'करून पहा', 'करून पाहूया' अशा अनेक कृताचा आणि प्रयागाचा समावेश केलेला आहे. या विविध कृती, प्रयाग, निरीक्षणे तुम्ही स्वतः काळजीपूर्वक करा. तसेच आवश्यक तेथे तुमच्या शिक्षकांची, पालकांची व वर्गातील सहकाऱ्यांची मदत घ्या. पाठांमध्ये काही ठिकाणी तुम्हांला माहिती शोधावी लागल, तो शोधण्यासाठी ग्रंथालय, तत्रज्ञान जस इंटरनेट याचीही मदत घ्या.

Mi Abhimanyu - Novel: मी अभिमन्यू - कादंबरी

by Satishkumar Patil

डॉ. सतिशकुमार पाटील लिखित मी अभिमन्यू या पुस्तकात मृत्यू समोर उभा असताना मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो. मृत्यू दारात उभा आहे तेव्हा त्या अभिमन्यूच्या मनात आलेले विचार, त्या विचारातून मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ याचे सुंदर मंथन हे सविस्तर कांदबरीमध्ये दाखवले आहे.

Rahu De Gharate - Novel: राहू दे घरटे - कादंबरी

by Shubhangi Paseband

शुभांगी पासेबंद लिखित राहू दे घरटे या पुस्तकामध्ये महिलांचे प्रश्न, मुलींची दुर्दशा, स्त्री भ्रूणहत्या त्यावर उपाय दाखवायचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. एखाद्या स्त्री ने समाजात न घाबरता स्वतःच्या हिमतीवर आपले वेगळे स्थान कसे निर्माण करावे हे या कादंबरीत सविस्तर पणे सांगितलेले आहे. प्रस्तुत कादंबरीतली नायिका, आईची लाडकी लेक, लेखिकेने तिच्या गुणवत्तेतून, निरीक्षणातून रेखाटल्याचं जाणवतं. भोगवादाचा उच्छाद आजही स्त्रीच्या माथी मारला जातोय. कुटुंबातलं विस्कटलेपण आणि नात्या-नात्यातली बेबनावगिरी या कहाणीत दिसून येते. एकीकडे समाजात स्त्रियांच्या कर्तबगारीचे ढोल बडवले जातात असं चित्र आहे; तर दुसरीकडे स्त्री कितीही प्रगल्भ, विचारशील असली तरी तिचा मानसिक, शारीरिक छळ व शोषण अव्याहतपणे सुरूच आहे.

Doctor Chanakya - Novel: डॉक्टर चाणक्य - कादंबरी

by Shashank Parulekar

डॉ. शशांक परुळेकर लिखित डॉक्टर चाणक्य या पुस्तकामध्ये लेखकांनी आपला वैद्यकीय क्षेत्राबाबत चा पालकांचा व मुलांचा जो दृष्टीकोन आहे तो कसा असावा व स्वतःचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव लेखकाने याद्वारे सांगितला आहे.

Manus Mhanun Jaganyasathi - Novel: माणूस म्हणून जगण्यासाठी - कादंबरी

by Vivek Pandit

माणूस म्हणून जगण्यासाठी हे पुस्तक स्वातंत्र्य, असंघटितांची संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून दुर्बलांना सामर्थ्यवान बनविण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. विकासाची नेमकी व्याख्या समजून घेतल्याशिवाय या प्रक्रियेचे आकलन होणार नाही. रस्ते, पूल, उड्डाणपूल, गगनचुंबी इमारती, दूरसंचार व संपर्काची साधने, वीज निर्मितीचे नेत्रदीपक प्रकल्प, गोल्फ क्लब, झगझगते मॉल्स, विशेष आर्थिक क्षेत्र यावर विकास तोलला असता भ्रामक चित्र उभे राहते. स्थिरावलेल्या पारंपरिक अर्थव्यवस्थेला धक्के देत आधुनिक अर्थव्यवस्था गती घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते, यात शंका नाही. खरा विकास या प्रगतीच्या पलीकडे व अधिक मूलभूत असतो. अन्न, आरोग्य, शिक्षण, पाणी, लसीकरण, पोषण, स्वच्छता, वीज या पलीकडे मानवी मनाचा स्वातंत्र्य व सहजतेच्या वातावरणात झालेला विकास म्हणजेच खरा विकास होय. अन्याय-अत्याचाराला मूक संमती असणे, शोषणासमोर गुडघे टेकणे, यथास्थिती मान्य करणे, गुलामीचे जिणे निमूटपणे स्वीकारणे, या व अशा शांततेच्या संस्कृतीचे परिवर्तन हाच विकासाचा मार्ग आहे.

Marathi Balbharti class 6 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या भावविश्‍वातील पाठ व कवितांचा समावेश पाठ्यपुस्तकात केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी, सारे हसूया, वाचा, ओळखा पाहू, विचार करून सांगूया, भाषेची गंमत पाहूया' या शीर्षकांखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यांस वाव दिला आहे. 'आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली व्याकरण घटकांची सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे.

Bhugol class 6 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

भूगोल इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो. हा विषय शिकण्यासाठी निरीक्षण, आकलन, विश्लेषण ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. ती नेहमी वापरा, जोपासा. नकाश, आलेख, चित्राकृती, माहिती संप्रेषण, तक्ते, इत्यादी या विषयाच्या अभ्यासाची साधने आहेत.

Purandarche Ratna - Novel: पुरंदरचे रत्न - कादंबरी

by Shri. Dattatray Bhapkar

इतिहासात अनेक शुर-वीर जन्माला आले व आपल्या पराक्रमाची ओळख ठेवून गेले. शिवकाळातही अशा अनेक विरांनी आपला पराक्रम गाजविला. अनेक पडद्यासमोर आले, तर काही पडद्यामागेच राहिले. त्यामुळे त्यांचा पराक्रम काही कमी होत नाही. अशाच एका विराची ओळख श्री दत्तात्रय नाथा भापकर यांनी आपल्या या ऐतिहासिक कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी काल्पनिक कथेवर अवलंबून असली तरी, शिवकालात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून “भिकाजी" या विराचे कार्य आहे.

Ashru - Novel: अश्रू - कादंबरी

by Vishnu Sakharam Khandekar

या विसाव्या शतकानं जगाला बर्‍यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे. मूल्ये जपणारा सामान्य माणूस , ज्याने आयुष्यात विशेष काही केले नाही आहे पण वाईट करताना आपल्याला झालेला अन्याय लक्षातघेऊन वाईट करण्यास न कतणारा सामान्य माणूस.

Abhyantar - Novel: अभ्यंतर - कादंबरी

by Vinita Deshpande

अभ्यंतर या कादंबरीचे विशेष म्हणजे ती समाजव्यवस्थेवर आधारित असून आजच्या काळात या विषयावर विचार करायला लवणारी आहे. सम्राट अशोकने अखंड भारतावर दीर्घकाळ राज्य केले. तो एक शूरवीर योद्धा तर होताच, एक अनुशासित आणि सुनियोजित शासनव्यवस्थेसाठी त्याने केलेले प्रयत्न या कादंबरीत मांडले आहे. कलिंगयुद्धानंतर सम्राट अशोकच्या जीवनाचा या कथानकात घेतलेला आढावा, त्याची मनस्थिती, समस्त भारतात सर्वधर्मसमभाव साधण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न आणि ज्ञानकोशाची गुंफण लेखिकेने लीलया गुंफली आहे. कथानकातील भाषाप्रयोग तुम्हाला गतकाळात घेऊन जातो.

Pralay Janma Pralayacha - Novel: प्रलय जन्म प्रलयाचा - कादंबरी

by Shubham Suresh Rokade

"विनाश! मला विनाश दिसत आहे राजन. ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील, अर्धे आकाश काळेकुट्ट आणि अर्धे आकाश लाल रंगाचे असेल ; त्यावेळी जी जन्माला येईल ती तुझ्या वंशाचा निर्वंश करेल. राजन तुझा निर्वंश फार दूर नाही___! ती तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे___! “महर्षी, कोण 'ती'___? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात___? आणि हे कधी, कधी होणार आहे? मला फार चिंता वाटत आहे___? “फार दूर नाही राजन. तुझा मृत्यू, लवकरच तुझा मृत्यू होईल. तुझा पुत्र तुझे राज्य जेव्हा चालवायला घेईल त्या वेळी त्याच्या हातून अधम व घोर पापकर्मे घडतील. त्याच कर्माचे फळ म्हणजे तिचा जन्म आणि जेव्हा ती जन्माला येईल त्या क्षणापासूनतुझ्या तुझ्या वंशाचा अंतःकाळ काळ सुरू होईल. तुझा निर्वंश होण्याचा काळ सुरू होईल___ अशी प्रलय-जन्म प्रलयाचा ऐतिहासिक आणि थरारक कथा कादंबरी शुभम रोक़डे यांनी वाचकांच्या हाती घेऊन आले आहेत.

Mastanicha Bajirao - Novel: मस्तानीचा बाजीराव - कादंबरी

by Muralidhar Javadekar

महाराष्ट्राचा दुसरा शिवाजी अन्धकारमय स्थितीत अन्तर्धान पावत असल्याचे चित्र मनावर खोल जखम करते. बाजीरावाची कथा व मस्तानीची व्यथा प्रा. मुरलीधर जावडेकर यांनी आपल्या समर्थ लेखणीने एक अमर कलाकृती म्हणून या नाटकाच्या रूपाने मराठी वाचकांसमोर मांडली आहे. नाट्याच्या पानोपानी बाजीरावाची मनोव्यथा त्याच्या हृदय पिळवटून निघालेल्या शब्दांत व्यक्त होते. छत्रपतींच्या दरबारी बाजीरावाबद्दल किल्मिष ओतणारे स्वर्थलंपट मुत्सद्दी, त्यांचे विचार आणि बाजीरावाची धडाडी यांतील भेद उत्कृष्टपणे उकलून दाखविला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक उत्कट भावमधुर पण अंती करुण अशा बाजीराव व मस्तानी यांच्या नितांत सुंदर प्रेमकथेवर आधारलेले पण त्या कथेचे शृंगार, शौर्य, त्यात यांचे पापुद्रे अलगद बाजूस करून आतील करुण, दाहक मनोव्यथेचे असंख्य थर नाजुकपणे उकलून एका शोकांतिकेच्या मुळाशी जाऊन ते कौशल्याने वाचकांसमोर लेखकाने नाटकाच्या रुपाने ठेवले आहे.

Suryaputra Lokmanya - Novel: सूर्यपुत्र लोकमान्य - कादंबरी

by Smita Damle

लोलकातून (प्रिझम् मधून) सूर्यकिरणं आरपार गेली की त्यातले सप्तरंग उजळून निघतात. कै.सदाशिव विनायक बापट यांच्या लोकमान्य टिळकांच्या ‘आठवणी आणि आख्यायिका' या दोन खंडांचंही तसंच आहे. स. वि. बापटांनी चिवटपणे, अफाट मेहनत घेऊन ह्या आठवणींच्या रूपाने लोकमान्यांना आपल्यासमोर कायमचं जिवंत केलं. त्याचाच आढावा घेत ही कांदबरी डॉ. स्मिता दामले यांनी वाचकांसमोर आणली आहे.

Chetkin - Novel: चेटकीण - कादंबरी

by Narayan Dharap

गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित "चेटकीण' ही कादंबरी. अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणाऱ्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

Samajshastra class 12 - Maharashtra Board: समाजशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

समाजशास्त्र इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये काही माहिती चौकटीत दिली आहे. शिवाय प्रात्यक्षिकासाठी कृती करण्यास सुचवले आहे. तुमचे स्वयंअध्ययन सोपे व्हावे, त्यामध्ये रस निर्माण व्हावा यासाठी क्यूआर कोडचा उपयोग केला आहे आणि यामुळे तुमच्या क्रियाशील सहभागाला चालना मिळेल. या पाठ्यपुस्तकामुळे समाजशास्त्राच्या अभ्यासकास भारतीय समाजाचे अनेक स्तर आणि वैविध्यपूर्ण संस्कृती समजून घेणे सुलभ होईल. या पाठ्यपुस्तकात अधोरेखित भारतीय समाजाचे प्रभावी स्वरूप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही भारतीय समाजाचे नवीन दृष्टिकोनातून आकलन करून घ्याल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

Yugandhar - Novel: युगंधर - कादंबरी

by Shivaji Sawant

हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे.भारतीय समाज व संस्कॄती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमदभागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या काही वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूस-नीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तावापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.! त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती - ‘युगंधर’!!

Agarkar Vangamay Khand 1 - Novel: आगरकर-वाङ्मय खंड १ - कादंबरी

by M. G. Natu D. Y. Deshpande

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी माधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कर्‍हाड, अकोला, रत्नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करतांना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरु करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर,व विष्णुशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.

Annadata Sukhi Bhav - Novel: अन्नदाता सुखी भव - कादंबरी

by Bhagyashree Patil

भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून कित्येक लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेती, शेतकरी हा सर्वांचाच खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्याला अन्नदाता, कष्टकरी, पोशिंदा या नावांनी संबोधले जाते. या क्षेत्रात हरितक्रांती, धवलक्रांती, जलक्रांती, यांसारख्या वेगवेगळ्या क्रांती होत आहेत. देश प्रगती करत आहे. या पुस्तकात कोणतेही तत्वज्ञान नाही, कोणताही उपदेश नाही. आहेत ते नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन! आज देशाने कितीही प्रगती केली असली तरी शेतकरी हा म्हणावा तितका प्रगती करताना दिसत नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा आणि त्यातुन येणारे नैराश्य यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. काहीही करून हे थांबले पाहिजे. त्यासाठीच या भल्या मोठ्या जगात या अडचणींवर मात करण्यातला खारीचा वाटा म्हणुन लेखकाने त्याचे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहेत.

Mann Mein Hain Vishwas - Novel: मन में है विश्वास - कादंबरी

by Vishwas Nangre Patil

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

Refine Search

Showing 51 through 75 of 115 results