Browse Results

Showing 26 through 50 of 112 results

RAW Bhartiya Guptacharsansthechi Goodhgatha - Novel: रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा - कादंबरी

by Ravi Amale

‘रॉ’___ रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ’ची अशी कहाणी. बांग्लादेश मुक्तियुद्धाची आणि पाकीस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवयांना पुरुन उरण्याची. ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरुन चालत असतात ही बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तिथे नैतिक-अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘रॉ’च्या अनेक ज्ञान-अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गुढ अंतरंगाचे.

Rajyashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: राज्यशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

राज्यशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकाची (१) राजकीय संकल्पना, (२) तुलनात्मक शासन आणि राजकारण, (३) लोकप्रशासन आणि (४) आंतरराष्ट्रीय संबंध या चार विभागांत विभागणी करण्यात आली आहे. या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात वस्तुनिष्ठ, लघूत्तरी व दीर्घोत्तरी अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या उपयोजनात्मक प्रश्न व त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यांचा प्रत्येक प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

Rajyashastra class 12 - Maharashtra Board: राज्यशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

राज्यशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. बारावीच्या पाठ्यपुस्तकात जगातील इ.स.१९९१ पासूनच्या समकालीन घटनांचा निर्देश आहे. त्यात जगातील १९९१ पासूनच्या विविध घटनांचे स्थान तसेच जागतिकीकरणाच्या संदर्भात ज्या संकल्पना विविध चर्चेतून उदयाला आल्या त्यांचा परिचय करून देण्यात आला आहे. पर्यावरण, शाश्वत विकास, गरिबी आणि लिंगभावासारखे मानवी प्रश्न इत्यादींचा या पाठ्यपुस्तकात समावेश आहे. त्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने तसेच त्याबाबतची चिंता आणि त्याचे महत्त्व भारताच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत.

Rajyashastra class 11 - Maharashtra Board: राज्यशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

राज्यशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये चार विभाग केले आहेत - राजकीय संकल्पना, तुलनात्मक शासनसंस्था, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध, या प्रत्येक विभागाची सुरुवात त्या संबंधित विषयाच्या प्रस्तावनेने करण्यात आलेली आहे. या क्षेत्रांतील महत्त्वाच्या संकल्पनांची तोंडओळख करून देणे हा यामागील उद्देश आहे. या सर्व संकल्पना भारताच्या संदर्भात अभ्यासायच्या आहेत. अध्ययन अधिक सुलभ, रंजक व कृतीयुक्त होण्यासाठी तुम्हाला माहितीपर चौकटी, विविध कृती विषयाच्या प्रस्तावनेने स्पष्ट करण्यात आलेली आहे.

Rajkiya Vicharpranalicha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU

by Pramod Rajendra Tambe Haridas Arjun Jadhav

द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र सामान्य (G-2) स्तरावरील शैक्षणिक वर्ष सन 2020-21 च्या CBCS Pattern च्या Core Course साठी 'राजकीय विचारप्रणालीचा परिचय' हा अभ्यासक्रम सत्र-4 साठी अभ्यासला जाणार आहे. 'राजकीय विचारप्रणाली' हा राज्यशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. राज्यशास्त्र बी.ए.भाग-2 सत्र-4 मध्ये या चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 1 'मार्क्सवाद' यामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद, मार्क्सवादी राज्य व नव मार्क्सवाद' हे उपघटक शिकणार आहोत. प्रकरण 2 'फुले-आंबेडकरवाद' या विचारप्रणालीमध्ये समता, जात आणि धर्म व लोकशाही याविषयी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार शिकणार आहे. प्रकरण 3 'गांधीवाद महात्मा गांधींचे सत्य आणि अहिंसा, ग्राम स्वराज्य सिद्धान्त, सभागृह हे उपघटक अभ्यासणार आहोत. प्रकरण 4 'स्त्रीवाद' मध्ये स्त्रीवादाचा अर्थ व स्वरूप, उदारमतवादी स्त्रीवाद, भारतातील स्त्रीवाद, विशेष संदर्भ: जात आणि पितृसत्ता यांच्या संदर्भात हे उपघटक अभ्यासणार आहोत.

Rajkiya Vicharpranali TYBA Fifth Semester - SPPU: राजकीय विचारप्रणाली टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar Nitin Birbal

राज्यशास्त्रातील राजकीय विचारप्रणाली ही अभ्यासशाखा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वच बदलांचे मूळ विचारप्रणाली असते. विचारप्रणाली व्यक्तीच्या जीवनाला दिशा देते तसेच तिला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते. या विचारप्रणालीच्या महत्त्वामुळे हा अभ्यासक्रम राज्यशास्त्र अभ्यासमंडळाने सुरू केलेला आहे. राष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद, फॅसिझम, फुले-आंबेडकरवाद, गांधीवाद, स्त्रीवाद या महत्त्वपूर्ण विचारप्रणालींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे.

Rahu De Gharate - Novel: राहू दे घरटे - कादंबरी

by Shubhangi Paseband

शुभांगी पासेबंद लिखित राहू दे घरटे या पुस्तकामध्ये महिलांचे प्रश्न, मुलींची दुर्दशा, स्त्री भ्रूणहत्या त्यावर उपाय दाखवायचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. एखाद्या स्त्री ने समाजात न घाबरता स्वतःच्या हिमतीवर आपले वेगळे स्थान कसे निर्माण करावे हे या कादंबरीत सविस्तर पणे सांगितलेले आहे. प्रस्तुत कादंबरीतली नायिका, आईची लाडकी लेक, लेखिकेने तिच्या गुणवत्तेतून, निरीक्षणातून रेखाटल्याचं जाणवतं. भोगवादाचा उच्छाद आजही स्त्रीच्या माथी मारला जातोय. कुटुंबातलं विस्कटलेपण आणि नात्या-नात्यातली बेबनावगिरी या कहाणीत दिसून येते. एकीकडे समाजात स्त्रियांच्या कर्तबगारीचे ढोल बडवले जातात असं चित्र आहे; तर दुसरीकडे स्त्री कितीही प्रगल्भ, विचारशील असली तरी तिचा मानसिक, शारीरिक छळ व शोषण अव्याहतपणे सुरूच आहे.

Radhey - Novel: राधेय - कादंबरी

by Ranjit Desai

"राधेय’ ही रणजित देसाईंची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. प्रास्ताविकेत देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं ? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.

Purandarche Ratna - Novel: पुरंदरचे रत्न - कादंबरी

by Shri. Dattatray Bhapkar

इतिहासात अनेक शुर-वीर जन्माला आले व आपल्या पराक्रमाची ओळख ठेवून गेले. शिवकाळातही अशा अनेक विरांनी आपला पराक्रम गाजविला. अनेक पडद्यासमोर आले, तर काही पडद्यामागेच राहिले. त्यामुळे त्यांचा पराक्रम काही कमी होत नाही. अशाच एका विराची ओळख श्री दत्तात्रय नाथा भापकर यांनी आपल्या या ऐतिहासिक कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी काल्पनिक कथेवर अवलंबून असली तरी, शिवकालात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून “भिकाजी" या विराचे कार्य आहे.

Prarthana Upchar - Novel: प्रार्थना उपचार - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. मर्फी यांनी हे पुस्तक लिहिले आहे वाचकांना समजावून सांगण्यासाठी की ते त्यांच्या चांगल्या स्त्रोताचा स्रोत कसा प्राप्त करू शकतील आणि योग्य प्रार्थनेद्वारे इच्छित परिणाम मिळवू शकतील. प्रार्थना कशी करावी, रोजच्या कामाचा भाग म्हणून प्रार्थना कशी ठेवावी, आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका इत्यादी प्रार्थना कशी वापरायच्या हे नियतकालिक आहे. मर्फीच्या म्हणण्यानुसार, प्रार्थनेत अडचणीच्या वेळी नेहमीच मदत असते, परंतु प्रार्थनेला आपल्या जीवनातील अविभाज्य आणि रचनात्मक भाग बनविण्यास त्रास मिळण्याची गरज नाही.

Pralay Janma Pralayacha - Novel: प्रलय जन्म प्रलयाचा - कादंबरी

by Shubham Suresh Rokade

"विनाश! मला विनाश दिसत आहे राजन. ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील, अर्धे आकाश काळेकुट्ट आणि अर्धे आकाश लाल रंगाचे असेल ; त्यावेळी जी जन्माला येईल ती तुझ्या वंशाचा निर्वंश करेल. राजन तुझा निर्वंश फार दूर नाही___! ती तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे___! “महर्षी, कोण 'ती'___? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात___? आणि हे कधी, कधी होणार आहे? मला फार चिंता वाटत आहे___? “फार दूर नाही राजन. तुझा मृत्यू, लवकरच तुझा मृत्यू होईल. तुझा पुत्र तुझे राज्य जेव्हा चालवायला घेईल त्या वेळी त्याच्या हातून अधम व घोर पापकर्मे घडतील. त्याच कर्माचे फळ म्हणजे तिचा जन्म आणि जेव्हा ती जन्माला येईल त्या क्षणापासूनतुझ्या तुझ्या वंशाचा अंतःकाळ काळ सुरू होईल. तुझा निर्वंश होण्याचा काळ सुरू होईल___ अशी प्रलय-जन्म प्रलयाचा ऐतिहासिक आणि थरारक कथा कादंबरी शुभम रोक़डे यांनी वाचकांच्या हाती घेऊन आले आहेत.

Pharmacist Tumchya Arogyasathi - Novel: फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी - कादंबरी

by Shri. Ashish Karle

अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे. आरोग्याशी संदर्भात सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्वपूर्ण असतात आणि या सेवा पुरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचा कधी न कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच अगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गरजांपर्यंत__ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शननुसार) औषध वितरित (डिस्पेन्स) करणं एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते. दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू आहेत. फार्मासिस्टच्या अशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे फार्मासिस्ट आणि काय आहे त्याची भूमिका तुमच्या आरोग्यसंदर्भात__

Parisar Abhyas class 3 - Maharashtra Board: परिसर अभ्यास इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे, आणि या पुस्तकाद्वारे विदयार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होईल.

Parisar Abhyas Bhag 1 class 5 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पंचवीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे व नकाशे दिले आहेत. या पाठ्यपुस्तकात ‘सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', 'वाचा व विचार करा', अशा शीर्षकांखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांत विविधता आणली आहे. या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होणार आहे.

Parisar Abhyas Bhag 1 class 4 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे आहेत. चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा हा प्रयत्न आहे. या पाठ्यपुस्तकात 'सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', अशा शीर्षकाखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. कालानुरूप आणि आशयसुसंगत अशी जीवनमूल्येही विद्यार्थ्यांवर सहजपणे बिंबवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे.

Nyay - Novel: न्याय - कादंबरी

by Jagdish Khandewale

हजार लोकांची सभा आठ दहा जण उधळून लावू शकतात. खरे म्हणजे जमलेल्या लोकांचा नुसत्या हुंकाराने हे गर्भगळीत होऊ शकतात पण ते तसे करीत नाही म्हणूनच यांचे फावते. पगारवाढ आणि सवलती करता जागृत असण्याऱ्या संघटना, संस्थेतील गैरकारभाराबद्दल मौन बाळगून असतात. कोणी एकट्याने याविरोधात आवाज उठविल्यास त्याला गप्प करण्यात येते. गप्प झालाच नाही तर त्यालाच आरोपी ठरविण्यात येते आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठविण्यात येते. दुर्जन व्यक्ती फार बुद्धिमान असतात असे काही नसते. सज्जन माणसे चाकोरी बाहेर वागत नाहीत, असंघटित असतात याचा गैरफायदा दुर्जनांना मिळतो एवढेच. अशाच व्यवस्थेचा एक बळी, नरेन. संधी एकदाच दार ठोठावते असे म्हणतात. नरेनने या संधीचा पूर्ण फायदा घेतला पण ते तेवढे सोपे नव्हते. ही वास्तवाशी जवळिक साधणारी, मनोरंजक आणि विषयांचे वैविध्य राखणारी कथा आहे.

Muktipatha: मुक्तिपथ

by Ashok Tapase Harshada Tapase

मुक्तिपथ या पुस्तकामध्ये विश्वाची आजची परिस्थिीती पाहून अनेकदा अनेकांना असे वाटते, "युद्ध नको बुद्ध हवा" पण बुद्ध म्हणजे नक्की काय हे या पुस्तकामधून शिकवले आहे. यामध्ये बुद्धांची शिकवण दिली आहे. बुद्धांचे विचार, सुखाचा, मुक्तीचा मार्ग, 'तिपिटक' या पुस्तकात सांगितले आहेत.

Mrutyunjayee - Novel: मृत्युंज़यी - कादंबरी

by Ratnakar Matkari

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्‍याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्‍या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.

Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी

by Ulhas Hari Joshi

आपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.

Mi Kon Aahe - Novel: मी कोण आहे - कादंबरी

by Dada Bhagwan

फक्त जगण्यापलीकडे जीवन काय आहे हे स्वतःला कोणी विचारले नाही? जीवनाचा खरा हेतू काय आहे? फक्त जगण्यापेक्षा उच्च उद्देश असणे आवश्यक आहे. “मी कोण आहे?” या पुस्तकात ज्ञानी पुरुष (स्वत: च्या ज्ञानाचे मूर्तिमंत) दादा भगवान वर्णन करतात की अध्यात्मिक साधकांच्या वयस्क-जुन्या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच अंतिम जीवनाचा हेतू आहे: मी कोण आहे आणि कोण आहे जीवनात घडणार्‍या सर्व गोष्टींचा 'कर्ता'? दादाश्री असेही प्रश्न सोडवतात: “जीवनाच्या प्रवासाचे स्वरूप काय आहे?”, “जगाची निर्मिती कशी झाली?”, “देव कसा शोधायचा?”, “मी स्वतःची शुद्ध आत्मा कशी अनुभवू?”, आणि “मुक्ति म्हणजे काय?” शेवटी, दादाश्री वर्णन करतात की स्वत: चे ज्ञान प्राप्त करणे हे जीवनाचा प्राथमिक हेतू आहे आणि खरोखरच या अध्यात्माची सुरूवात आहे. आत्मज्ञान प्राप्त केल्यावर, आध्यात्मिक विकास सुरू होतो, ज्यानंतर एखाद्या व्यक्तीस अंतिम मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकेल.

Mi Abhimanyu - Novel: मी अभिमन्यू - कादंबरी

by Satishkumar Patil

डॉ. सतिशकुमार पाटील लिखित मी अभिमन्यू या पुस्तकात मृत्यू समोर उभा असताना मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो. मृत्यू दारात उभा आहे तेव्हा त्या अभिमन्यूच्या मनात आलेले विचार, त्या विचारातून मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ याचे सुंदर मंथन हे सविस्तर कांदबरीमध्ये दाखवले आहे.

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) - MIE

by Mauritius Institute of Education

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) Textbook Mauritius Institute of Education.

Mastanicha Bajirao - Novel: मस्तानीचा बाजीराव - कादंबरी

by Muralidhar Javadekar

महाराष्ट्राचा दुसरा शिवाजी अन्धकारमय स्थितीत अन्तर्धान पावत असल्याचे चित्र मनावर खोल जखम करते. बाजीरावाची कथा व मस्तानीची व्यथा प्रा. मुरलीधर जावडेकर यांनी आपल्या समर्थ लेखणीने एक अमर कलाकृती म्हणून या नाटकाच्या रूपाने मराठी वाचकांसमोर मांडली आहे. नाट्याच्या पानोपानी बाजीरावाची मनोव्यथा त्याच्या हृदय पिळवटून निघालेल्या शब्दांत व्यक्त होते. छत्रपतींच्या दरबारी बाजीरावाबद्दल किल्मिष ओतणारे स्वर्थलंपट मुत्सद्दी, त्यांचे विचार आणि बाजीरावाची धडाडी यांतील भेद उत्कृष्टपणे उकलून दाखविला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक उत्कट भावमधुर पण अंती करुण अशा बाजीराव व मस्तानी यांच्या नितांत सुंदर प्रेमकथेवर आधारलेले पण त्या कथेचे शृंगार, शौर्य, त्यात यांचे पापुद्रे अलगद बाजूस करून आतील करुण, दाहक मनोव्यथेचे असंख्य थर नाजुकपणे उकलून एका शोकांतिकेच्या मुळाशी जाऊन ते कौशल्याने वाचकांसमोर लेखकाने नाटकाच्या रुपाने ठेवले आहे.

Marathi Yuvakbharati Digest class 11 - Maharashtra Board Guide: मराठी युवकभारती डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी युवकभारती इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात एकूण पाच भाग दिलेले आहेत. त्यापैकी गद्य, पद्य, साहित्यप्रकार (नाटक), उपयोजित मराठी व व्याकरण. प्रत्येक गद्यपाठाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात लेखक/लेखिका व कवी/कवयित्री यांचा परिचय – लेखनवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांचा उल्लेख करून पुढे पाठाचा परिचय – शब्दार्थ – टिपा – वाक्प्रचार व अर्थ - कृति - स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे या क्रमाने पाठाचा सुसंगतवार अभ्यास करून दिला आहे. मार्गदर्शकात प्रत्येक नाट्यउताऱ्यावरील कृति-स्वाध्याय अचूक व समर्पक पद्धतीने सोडवून दिले आहेत. मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक कार्यात्मक व्याकरण घटकाचा यथायोग्य परामर्श घेऊन, सुबोध भाषेत समजावून देऊन प्रत्येक घटकासाठी दिलेल्या कृति-स्वाध्यायाची अचूक व समर्पक उत्तरे दिली आहेत.

Marathi Yuvakbharati class 12 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी युवकभारती इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सहा विभाग आहेत. पहिल्या दोन विभागातील गद्य-पद्यपाठांच्या माध्यमातून नामवंत साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींचा परिचय करून घेता घेता त्या साहित्यांमधील संस्काराने भाषा ही उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल. हे साहित्य तुमच्या वैचारिक आणि कल्पनाशक्तीच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. या साहित्यामधील आशय तुम्हांला आजच्या जीवनातील समस्यांची जाणीव करून देईल तसेच साहित्यिक कृतींमधील सौंदर्याचा आनंद घेत आपले जीवन अनुभवसमृद्ध करण्याचा वस्तुपाठही तुम्हांला मिळेल. चित्रांमुळे पाठ्यपुस्तकाचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. त्यामुळे आशयाचे आकलन अर्थपूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होईल.

Refine Search

Showing 26 through 50 of 112 results