Browse Results

Showing 26 through 50 of 115 results

Rajkiya Vicharpranali TYBA Fifth Semester - SPPU: राजकीय विचारप्रणाली टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar Nitin Birbal

राज्यशास्त्रातील राजकीय विचारप्रणाली ही अभ्यासशाखा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वच बदलांचे मूळ विचारप्रणाली असते. विचारप्रणाली व्यक्तीच्या जीवनाला दिशा देते तसेच तिला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते. या विचारप्रणालीच्या महत्त्वामुळे हा अभ्यासक्रम राज्यशास्त्र अभ्यासमंडळाने सुरू केलेला आहे. राष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद, फॅसिझम, फुले-आंबेडकरवाद, गांधीवाद, स्त्रीवाद या महत्त्वपूर्ण विचारप्रणालींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे.

Yugandhar - Novel: युगंधर - कादंबरी

by Shivaji Sawant

हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे.भारतीय समाज व संस्कॄती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमदभागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या काही वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूस-नीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तावापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.! त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती - ‘युगंधर’!!

10 Advanced Short Stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

The Advance level book of short stories from Pratham books, used in the ACR project, Pune.

10 Intermediate short stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

This is the 2nd part of selected stories in Full text with Human narrated audio, from Pratham books, which are used for the ACR project in Pune.

Amrutbindu - Novel: अमृतबिंदू - कादंबरी

by Ravindra Fadake

रवींद्र फडके लिखित अमृतबिंदू या पुस्तकामध्ये संत तुकाराम महाराज यांचे अभंग व त्याचे अर्थ आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांमधे विविध भावनांचे आविष्करण आढळते, जसे पांडुरंगाबद्दल उत्कट प्रेम, वैराग्य,भक्ती, महाराजांचे विविध अनुभव ईत्यादी. तसेच अभगांमधे अध्यात्माचे विविध पैलू उदाहरणार्थ विविध भक्तीमार्ग, भगवंताच्या भेटिसाठी आवश्यक असणारे प्रेम, वैराग्य, श्रद्धा ईत्यादी भाव; मुख्यत: नामस्मरण हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Doctor Chanakya - Novel: डॉक्टर चाणक्य - कादंबरी

by Shashank Parulekar

डॉ. शशांक परुळेकर लिखित डॉक्टर चाणक्य या पुस्तकामध्ये लेखकांनी आपला वैद्यकीय क्षेत्राबाबत चा पालकांचा व मुलांचा जो दृष्टीकोन आहे तो कसा असावा व स्वतःचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव लेखकाने याद्वारे सांगितला आहे.

Mann Mein Hain Vishwas - Novel: मन में है विश्वास - कादंबरी

by Vishwas Nangre Patil

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

Manusmruti - Novel: मनुस्मृति - कादंबरी

by Shri. Ashok Kothare

अशोक कोठारे लिखित मनुस्मृति या पुस्तकामध्ये मुनुस्मृती चे भाषांतर मराठी भाषेत केले असून त्यांनी या पुस्तकामध्ये चार वर्ण सांगितलेले आहेत त्यामध्ये ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ दाखवला आहे व चार वर्णांचे नियम व रूढी परंपरा त्यामध्ये आहेत. यामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण सांगितले आहेत.

Radhey - Novel: राधेय - कादंबरी

by Ranjit Desai

"राधेय’ ही रणजित देसाईंची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. प्रास्ताविकेत देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं ? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.

Rahu De Gharate - Novel: राहू दे घरटे - कादंबरी

by Shubhangi Paseband

शुभांगी पासेबंद लिखित राहू दे घरटे या पुस्तकामध्ये महिलांचे प्रश्न, मुलींची दुर्दशा, स्त्री भ्रूणहत्या त्यावर उपाय दाखवायचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. एखाद्या स्त्री ने समाजात न घाबरता स्वतःच्या हिमतीवर आपले वेगळे स्थान कसे निर्माण करावे हे या कादंबरीत सविस्तर पणे सांगितलेले आहे. प्रस्तुत कादंबरीतली नायिका, आईची लाडकी लेक, लेखिकेने तिच्या गुणवत्तेतून, निरीक्षणातून रेखाटल्याचं जाणवतं. भोगवादाचा उच्छाद आजही स्त्रीच्या माथी मारला जातोय. कुटुंबातलं विस्कटलेपण आणि नात्या-नात्यातली बेबनावगिरी या कहाणीत दिसून येते. एकीकडे समाजात स्त्रियांच्या कर्तबगारीचे ढोल बडवले जातात असं चित्र आहे; तर दुसरीकडे स्त्री कितीही प्रगल्भ, विचारशील असली तरी तिचा मानसिक, शारीरिक छळ व शोषण अव्याहतपणे सुरूच आहे.

Yayati - Novel: ययाति - कादंबरी

by V. S. Khandekar

एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ 'ययाति'च्या रूपाने लेखकांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

Brahmand Ani Eshwar - Novel: ब्रह्मांड आणि ईश्वर - कादंबरी

by Shri. Dr. A. P. Dhande

ब्रह्मांड आणि ईश्वर या पुस्तकात समजलेले ब्रह्मांड आणि ईश्वर या संबंधी विज्ञान व तत्वज्ञान यांची सांगड घालून लेखकाने काही विचार प्रस्तुत केले आहे. या पुस्तकामध्ये विश्वाची माहिती दिलेली आहे. हिंदू संस्कृतीनुसार ब्रम्हदेवाने शुन्यातून विश्वनिर्मिती कशी केली, ब्रम्हदेव विश्वाच्या पूर्वी होते का नही, विश्वाची निर्मिती कशी झाली याची माहिती चित्राद्वारे दाखवली आहे.

Chetkin - Novel: चेटकीण - कादंबरी

by Narayan Dharap

गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित "चेटकीण' ही कादंबरी. अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणाऱ्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) - MIE

by Mauritius Institute of Education

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) Textbook Mauritius Institute of Education.

Purandarche Ratna - Novel: पुरंदरचे रत्न - कादंबरी

by Shri. Dattatray Bhapkar

इतिहासात अनेक शुर-वीर जन्माला आले व आपल्या पराक्रमाची ओळख ठेवून गेले. शिवकाळातही अशा अनेक विरांनी आपला पराक्रम गाजविला. अनेक पडद्यासमोर आले, तर काही पडद्यामागेच राहिले. त्यामुळे त्यांचा पराक्रम काही कमी होत नाही. अशाच एका विराची ओळख श्री दत्तात्रय नाथा भापकर यांनी आपल्या या ऐतिहासिक कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी काल्पनिक कथेवर अवलंबून असली तरी, शिवकालात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून “भिकाजी" या विराचे कार्य आहे.

Sita Mithilechi Yoddha - Novel: सीता मिथिलाचे वॉरियर - कादंबरी

by Amish Tripathi

सीता: मिथिलाचे वॉरियर ऑफ मिथिला हे भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचे एक काल्पनिक पुस्तक आहे जे 29 मे 2017 रोजी प्रसिद्ध झाले होते. हे राम चंद्र मालिकेचे दुसरे पुस्तक आहे. मालिका ही रामायण ही भारतातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्य आहे. मालिकेतील प्रत्येक पुस्तक रामायणातील एका महत्त्वपूर्ण पात्रावर केंद्रित आहे. सीताः मिथिलाचा योद्धा सीतेच्या कथेवर लक्ष केंद्रित करतो. हे पुस्तक लक्ष्मीचे अवतार मानल्या जाणार्‍या कल्पित भारतीय राणी सीतेवर आधारित आहे. हे शीर्षक त्याच्या फेसबुक पेजवर लेखकाने उघड केले. मिथिलाचा राजा जनक या कथेतून एक मुलगी शेतात सोडलेली आढळली. लांडग्यांच्या पॅकमधून गिधाडचे तिचे रहस्यमयपणे संरक्षण केले जाते. राजा जनक तिला दत्तक घेतात पण राजा रावणच्या राक्षसासारख्या वासनांपासून भारताच्या दैवी भूमीच्या रक्षणासाठी ही अनाथ मुलगीच असेल याची त्यांना आश्चर्य वाटली नव्हती. सीतेचे बालपण आणि शिकार, तिचे रामसोबतचे लग्न आणि शेवटी तिचा 14 वर्षांचा वनवास, तिचा पती राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्यासह होते.

Antarmanachi Shakti - Novel: अंतर्मनाची शक्ती - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. जोसेफ मर्फीलिखित द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शस माइंड या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रस्तुत मराठी आवृत्ती 2018 साली प्रथम प्रकाशित झाला. पुस्तकामध्ये लेखक डॉ. जोसेफ मर्फी सांगत आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यात चमत्कार घडल्याचं मी स्वतः पाहिलं आहे. तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या जादुई शक्तीचा वापर केलात, तर असे चमत्कार तुमच्याही बाबतीत घडू शकतात. तुमची विचार करण्याची एक विशिष्ट सवय असते. तुम्ही ज्या शब्दांचा वापर वारंवार करता, जी चित्रं मनात रंगवता त्यामुळं तुमचं भाग्य घडतं, भविष्याला आकार मिळत असतो. कारण माणूस अंतर्मनात ज्याप्रमाणं विचार करतो, त्याप्रमाणंच तो बनतो. या गोष्टींचं तुम्हांला ज्ञान व्हावं हाच या पुस्तकाचा मूळ हेतू आहे.

Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Klesh Rahit Jeevan - Novel: क्लेश रहित जीवन - कादंबरी

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल. दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Manusaki - Novel: माणुसकी - कादंबरी

by Shri. Shripad Nagnath Rautwad

सामाजिक जीवनात हा मानव आईवडील सारख्या आपल्या मुख्य घटकांना देखील आज वृद्धाश्रमात सोडू लागला आहे, नातलग, गणगोत, आपुलकी, प्रेम, भावना, परोपकार, हे माणुसकीच्या घटकांना ठोकर देत हा मानव प्राणी आज या समाजात जीवन जगत आहे. त्यातच मानवांच्या निर्मितीचा गूढ असलेल्या निसर्गापासूनही हा मानव दूर झाला आहे. निसर्गाची कत्तल करू लागला. डिसीटल च्या दुनीयेत स्वतः डिजीटल झालाच, मात्र समाजालाही डिजीटल करत सुटला आहे. अश्या असंख्य मानवतेच्या पैलूंना माझ्या लेखणीतून स्पर्शून गेललेला हा 'माणुसकी' आपल्या हाती सोपवत आहे.

Mi Abhimanyu - Novel: मी अभिमन्यू - कादंबरी

by Satishkumar Patil

डॉ. सतिशकुमार पाटील लिखित मी अभिमन्यू या पुस्तकात मृत्यू समोर उभा असताना मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो. मृत्यू दारात उभा आहे तेव्हा त्या अभिमन्यूच्या मनात आलेले विचार, त्या विचारातून मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ याचे सुंदर मंथन हे सविस्तर कांदबरीमध्ये दाखवले आहे.

Mrutyunjayee - Novel: मृत्युंज़यी - कादंबरी

by Ratnakar Matkari

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्‍याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्‍या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.

Prarthana Upchar - Novel: प्रार्थना उपचार - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. मर्फी यांनी हे पुस्तक लिहिले आहे वाचकांना समजावून सांगण्यासाठी की ते त्यांच्या चांगल्या स्त्रोताचा स्रोत कसा प्राप्त करू शकतील आणि योग्य प्रार्थनेद्वारे इच्छित परिणाम मिळवू शकतील. प्रार्थना कशी करावी, रोजच्या कामाचा भाग म्हणून प्रार्थना कशी ठेवावी, आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका इत्यादी प्रार्थना कशी वापरायच्या हे नियतकालिक आहे. मर्फीच्या म्हणण्यानुसार, प्रार्थनेत अडचणीच्या वेळी नेहमीच मदत असते, परंतु प्रार्थनेला आपल्या जीवनातील अविभाज्य आणि रचनात्मक भाग बनविण्यास त्रास मिळण्याची गरज नाही.

RAW Bhartiya Guptacharsansthechi Goodhgatha - Novel: रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा - कादंबरी

by Ravi Amale

‘रॉ’___ रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ’ची अशी कहाणी. बांग्लादेश मुक्तियुद्धाची आणि पाकीस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवयांना पुरुन उरण्याची. ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरुन चालत असतात ही बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तिथे नैतिक-अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘रॉ’च्या अनेक ज्ञान-अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गुढ अंतरंगाचे.

Abhyantar - Novel: अभ्यंतर - कादंबरी

by Vinita Deshpande

अभ्यंतर या कादंबरीचे विशेष म्हणजे ती समाजव्यवस्थेवर आधारित असून आजच्या काळात या विषयावर विचार करायला लवणारी आहे. सम्राट अशोकने अखंड भारतावर दीर्घकाळ राज्य केले. तो एक शूरवीर योद्धा तर होताच, एक अनुशासित आणि सुनियोजित शासनव्यवस्थेसाठी त्याने केलेले प्रयत्न या कादंबरीत मांडले आहे. कलिंगयुद्धानंतर सम्राट अशोकच्या जीवनाचा या कथानकात घेतलेला आढावा, त्याची मनस्थिती, समस्त भारतात सर्वधर्मसमभाव साधण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न आणि ज्ञानकोशाची गुंफण लेखिकेने लीलया गुंफली आहे. कथानकातील भाषाप्रयोग तुम्हाला गतकाळात घेऊन जातो.

Refine Search

Showing 26 through 50 of 115 results