Browse Results

Showing 101 through 112 of 112 results

Ganit class 3 - Maharashtra Board: गणित इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात गणित संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयं-अध्ययन सुलभ व्हाव म्हणून पुस्तकात श्रेणीबद्ध (Graded) 'स्वाध्याय' आणि 'संवादांचा' समावेश करण्यात आला आहे. स्वाध्यायामधील प्रश्न विद्याथ्यानो स्वप्रयत्नाने सोडवावे अशी अपेक्षा आहे. स्वाध्याय कटाळवाण होऊ नयेत यासाठी त्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Marathi class 7 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड.

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो.

Samanya Vigyan class 6 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

सामान्य विज्ञान इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सोळा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात सामान्य विज्ञान विषयाच्या अपेक्षित क्षमता नमूद केल्या आहेत. या क्षमतांच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकातील आशयाची नावीन्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी निरीक्षण करणे, कृतींच्या आधारे माहिती मिळविणे, माहितीचे संकलन करणे व त्यानुसार वर्गीकरण, अनुमान करणे, निष्कर्ष काढणे इत्यादींवर आधारित कृती, उपक्रम व आशयासाठी पुस्तकात विविध शीर्षकांचा वापर केला आहे. पुस्तकात दिलेली पूरक माहिती विद्यार्थ्यांचे अध्ययन अधिक परिणामकारक करू शकेल.

Parisar Abhyas class 3 - Maharashtra Board: परिसर अभ्यास इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे, आणि या पुस्तकाद्वारे विदयार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होईल.

Khelu Karu Shiku class 2 - Maharashtra Board: खेळू करू शिकू दुसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya pathyapustak Nirmiti Va Abhyas Sanshodhan Mandal Pune

खेळू, करू, शिकू या पुस्तकामध्ये मुलांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी उपयोगी आहे. तसेच या पुस्तकामध्ये भरपूर चित्रे आहेत. ति पाहून कोणते खेळ कसे खेळावे हे कळण्यास मदत होईल. विविध शारीरिक हालचाली करणे, नवे खेळ आणि शर्यती शोधणे, साधी राखी, कागदाचे भिरभिरे, वाळलेल्या पानाफुलांपासून सौंदर्याकृती तयार करणे, कथा, संवाद, कविता, कोडी रंगकाम, शिल्प, वाद्यांची ओळख करून घेणे हे दाखवले आहे.

Khelu Karu Shiku class 3 - Maharashtra Board: खेळू करू शिकू इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya pathyapustak Nirmiti V Abhyas Sanshodhan Mandal Pune

खेळू, करू, शिकू या पुस्तकामध्ये मुलांना विविध शारीरिक हालचाली करणे, नवे खेळ आणि शर्यती शोधणे, फुलपाखरू, बचतपेटी, नारळाच्या करवंटीपासून कलाकृती तयार करणे, कथा, संवाद, कविता, कोडी, रंगकाम, शिल्प, वाद्यांची ओळख करून घेणे हे सारे या पुस्तकात दाखवले आहे.

Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Marathi Sulabhbharti class 6 - Maharashtra Board

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी सुलभभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालकेंद्रित असावी, स्वयंअध्ययनावर भर दिला जावा, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आनंददायी व्हावी असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या क्षमता प्राप्त कराव्यात त्यासाठी पाठ्यपुस्तकात भाषाविषयक अपेक्षित क्षमता विधानांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात पाठ व कवितांचा समावेश केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिकाधिक विकसित होण्यासाठी 'सुविचार', 'वाचू आणि हसू', 'वाचा', 'घोषवाक्ये', 'ओळखा पाहू', 'शब्दकोडी' यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनी नवीन शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर सहजतेने करावा, तसेच त्यांच्यामध्ये व्याकरणविषयक जाण निर्माण व्हावी, म्हणून हे सर्व मनोरंजक व सोप्या पद्धतीने दिले आहे. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पकता वापरून लेखन करता यावे, विचार व्यक्त करता यावे, यांसाठी वैविध्यपूर्ण प्रश्न व कृती पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

Rajkiya Vicharpranalicha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU

by Pramod Rajendra Tambe Haridas Arjun Jadhav

द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र सामान्य (G-2) स्तरावरील शैक्षणिक वर्ष सन 2020-21 च्या CBCS Pattern च्या Core Course साठी 'राजकीय विचारप्रणालीचा परिचय' हा अभ्यासक्रम सत्र-4 साठी अभ्यासला जाणार आहे. 'राजकीय विचारप्रणाली' हा राज्यशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. राज्यशास्त्र बी.ए.भाग-2 सत्र-4 मध्ये या चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 1 'मार्क्सवाद' यामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद, मार्क्सवादी राज्य व नव मार्क्सवाद' हे उपघटक शिकणार आहोत. प्रकरण 2 'फुले-आंबेडकरवाद' या विचारप्रणालीमध्ये समता, जात आणि धर्म व लोकशाही याविषयी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार शिकणार आहे. प्रकरण 3 'गांधीवाद महात्मा गांधींचे सत्य आणि अहिंसा, ग्राम स्वराज्य सिद्धान्त, सभागृह हे उपघटक अभ्यासणार आहोत. प्रकरण 4 'स्त्रीवाद' मध्ये स्त्रीवादाचा अर्थ व स्वरूप, उदारमतवादी स्त्रीवाद, भारतातील स्त्रीवाद, विशेष संदर्भ: जात आणि पितृसत्ता यांच्या संदर्भात हे उपघटक अभ्यासणार आहोत.

Rajkiya Vicharpranali TYBA Fifth Semester - SPPU: राजकीय विचारप्रणाली टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar Nitin Birbal

राज्यशास्त्रातील राजकीय विचारप्रणाली ही अभ्यासशाखा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वच बदलांचे मूळ विचारप्रणाली असते. विचारप्रणाली व्यक्तीच्या जीवनाला दिशा देते तसेच तिला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते. या विचारप्रणालीच्या महत्त्वामुळे हा अभ्यासक्रम राज्यशास्त्र अभ्यासमंडळाने सुरू केलेला आहे. राष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद, फॅसिझम, फुले-आंबेडकरवाद, गांधीवाद, स्त्रीवाद या महत्त्वपूर्ण विचारप्रणालींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे.

Loksankhya Bhugol Paper 1 SYBA Third Semester - SPPU

by Abc

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विशेष स्तरावर हा ‘लोकसंख्या भूगोल’ विषय लागू केला आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने लोकसंख्या ही एक संपदा आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक त्याचबरोबर लोकसंख्याविषयक घटकांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर व वाढीवर होत असतो. त्याहूनच विविध प्रदेशात लोकसंख्येची रचना तयार होते. लोकसंख्या ही एक संपदा असली तरी साधनसंपदेच्या तुलनेत लोकसंख्या जास्त झाल्यास संपदेवर अधिक ताण पडून दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. 'लोकसंख्या' या विषयावर अनेक भाषांमध्ये ग्रंथ उपलब्ध आहेत. लोकसंख्या व भौगोलिक पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करताना आणि आपल्या देशातील लोकसंख्याविषयक अभ्यास मांडणी करताना अतिशय सोप्या भाषेचा वापर करून अभ्यासकांच्या हाती हे पुस्तक देण्याचा हेतू या पुस्तकाने साध्य केला आहे.

Samanata

by Shri. Dinkar Sakrikar

प्रस्तुत भाषांतर हे टॉने याच्या ‘इक्वालिटी’ या ग्रंथाचे आहे. या ग्रंथात त्यांनी समानतेच्या संकल्पनेचा अत्यंत सांगोपांग व शास्त्रशुद्ध असा उदापोह केला आहे. त्यांची समानतेची कल्पना ही सामाजिक न्यायाच्या संपूर्ण अशा आकलनावर आधारलेली आहे, समाजाच्या मध्यवर्ती आणि चिरस्थायी अशा प्रक्रियेतच समानता अनुस्यूत असली पाहिजे. समाजातील लोकांचे परस्परांशी उचित संबंध अशी ते समानतेची व्याख्या करतात. हा संपूर्ण विचार त्यांच्या मूळ ग्रंथातूनच समजून घेतला पाहिजे.

Refine Search

Showing 101 through 112 of 112 results