Browse Results

Showing 76 through 100 of 113 results

Chetkin - Novel: चेटकीण - कादंबरी

by Narayan Dharap

गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित "चेटकीण' ही कादंबरी. अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणाऱ्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) - MIE

by Mauritius Institute of Education

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) Textbook Mauritius Institute of Education.

Purandarche Ratna - Novel: पुरंदरचे रत्न - कादंबरी

by Shri. Dattatray Bhapkar

इतिहासात अनेक शुर-वीर जन्माला आले व आपल्या पराक्रमाची ओळख ठेवून गेले. शिवकाळातही अशा अनेक विरांनी आपला पराक्रम गाजविला. अनेक पडद्यासमोर आले, तर काही पडद्यामागेच राहिले. त्यामुळे त्यांचा पराक्रम काही कमी होत नाही. अशाच एका विराची ओळख श्री दत्तात्रय नाथा भापकर यांनी आपल्या या ऐतिहासिक कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी काल्पनिक कथेवर अवलंबून असली तरी, शिवकालात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून “भिकाजी" या विराचे कार्य आहे.

Sita Mithilechi Yoddha - Novel: सीता मिथिलाचे वॉरियर - कादंबरी

by Amish Tripathi

सीता: मिथिलाचे वॉरियर ऑफ मिथिला हे भारतीय लेखक अमिश त्रिपाठी यांचे एक काल्पनिक पुस्तक आहे जे 29 मे 2017 रोजी प्रसिद्ध झाले होते. हे राम चंद्र मालिकेचे दुसरे पुस्तक आहे. मालिका ही रामायण ही भारतातील सर्वात प्रसिद्ध महाकाव्य आहे. मालिकेतील प्रत्येक पुस्तक रामायणातील एका महत्त्वपूर्ण पात्रावर केंद्रित आहे. सीताः मिथिलाचा योद्धा सीतेच्या कथेवर लक्ष केंद्रित करतो. हे पुस्तक लक्ष्मीचे अवतार मानल्या जाणार्‍या कल्पित भारतीय राणी सीतेवर आधारित आहे. हे शीर्षक त्याच्या फेसबुक पेजवर लेखकाने उघड केले. मिथिलाचा राजा जनक या कथेतून एक मुलगी शेतात सोडलेली आढळली. लांडग्यांच्या पॅकमधून गिधाडचे तिचे रहस्यमयपणे संरक्षण केले जाते. राजा जनक तिला दत्तक घेतात पण राजा रावणच्या राक्षसासारख्या वासनांपासून भारताच्या दैवी भूमीच्या रक्षणासाठी ही अनाथ मुलगीच असेल याची त्यांना आश्चर्य वाटली नव्हती. सीतेचे बालपण आणि शिकार, तिचे रामसोबतचे लग्न आणि शेवटी तिचा 14 वर्षांचा वनवास, तिचा पती राम आणि त्याचा भाऊ लक्ष्मण यांच्यासह होते.

10 Advanced Short Stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

The Advance level book of short stories from Pratham books, used in the ACR project, Pune.

10 Intermediate short stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

This is the 2nd part of selected stories in Full text with Human narrated audio, from Pratham books, which are used for the ACR project in Pune.

Amrutbindu - Novel: अमृतबिंदू - कादंबरी

by Ravindra Fadake

रवींद्र फडके लिखित अमृतबिंदू या पुस्तकामध्ये संत तुकाराम महाराज यांचे अभंग व त्याचे अर्थ आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांमधे विविध भावनांचे आविष्करण आढळते, जसे पांडुरंगाबद्दल उत्कट प्रेम, वैराग्य,भक्ती, महाराजांचे विविध अनुभव ईत्यादी. तसेच अभगांमधे अध्यात्माचे विविध पैलू उदाहरणार्थ विविध भक्तीमार्ग, भगवंताच्या भेटिसाठी आवश्यक असणारे प्रेम, वैराग्य, श्रद्धा ईत्यादी भाव; मुख्यत: नामस्मरण हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Doctor Chanakya - Novel: डॉक्टर चाणक्य - कादंबरी

by Shashank Parulekar

डॉ. शशांक परुळेकर लिखित डॉक्टर चाणक्य या पुस्तकामध्ये लेखकांनी आपला वैद्यकीय क्षेत्राबाबत चा पालकांचा व मुलांचा जो दृष्टीकोन आहे तो कसा असावा व स्वतःचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव लेखकाने याद्वारे सांगितला आहे.

Mann Mein Hain Vishwas - Novel: मन में है विश्वास - कादंबरी

by Vishwas Nangre Patil

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

Manusmruti - Novel: मनुस्मृति - कादंबरी

by Shri. Ashok Kothare

अशोक कोठारे लिखित मनुस्मृति या पुस्तकामध्ये मुनुस्मृती चे भाषांतर मराठी भाषेत केले असून त्यांनी या पुस्तकामध्ये चार वर्ण सांगितलेले आहेत त्यामध्ये ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ दाखवला आहे व चार वर्णांचे नियम व रूढी परंपरा त्यामध्ये आहेत. यामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण सांगितले आहेत.

Radhey - Novel: राधेय - कादंबरी

by Ranjit Desai

"राधेय’ ही रणजित देसाईंची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. प्रास्ताविकेत देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं ? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.

Rahu De Gharate - Novel: राहू दे घरटे - कादंबरी

by Shubhangi Paseband

शुभांगी पासेबंद लिखित राहू दे घरटे या पुस्तकामध्ये महिलांचे प्रश्न, मुलींची दुर्दशा, स्त्री भ्रूणहत्या त्यावर उपाय दाखवायचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. एखाद्या स्त्री ने समाजात न घाबरता स्वतःच्या हिमतीवर आपले वेगळे स्थान कसे निर्माण करावे हे या कादंबरीत सविस्तर पणे सांगितलेले आहे. प्रस्तुत कादंबरीतली नायिका, आईची लाडकी लेक, लेखिकेने तिच्या गुणवत्तेतून, निरीक्षणातून रेखाटल्याचं जाणवतं. भोगवादाचा उच्छाद आजही स्त्रीच्या माथी मारला जातोय. कुटुंबातलं विस्कटलेपण आणि नात्या-नात्यातली बेबनावगिरी या कहाणीत दिसून येते. एकीकडे समाजात स्त्रियांच्या कर्तबगारीचे ढोल बडवले जातात असं चित्र आहे; तर दुसरीकडे स्त्री कितीही प्रगल्भ, विचारशील असली तरी तिचा मानसिक, शारीरिक छळ व शोषण अव्याहतपणे सुरूच आहे.

Yayati - Novel: ययाति - कादंबरी

by V. S. Khandekar

एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ 'ययाति'च्या रूपाने लेखकांनी वाचकांपुढे ठेवला आहे. कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत. "ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

10 Basic short stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

10 Basic level short stories in Full text with Human Narration, selected from Pratham books for the ACR project in Pune.

20 Vya Shatakatil Jagacha Itihas 1914-1992 T.Y.B.A. Savitribai Phule Pune University: 20 व्या शतकातील जगाचा इतिहास 1914-1992 तृतीय वर्ष कला सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठ

by N. S. Tamboli

20 व्या शतकातील जगाचा इतिहास (1914-1992) [History of the World in 20th Century (1914-1992)] हे पुस्तक सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठाच्या जून 2015 च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार तसेच यू. जी. सी. अभ्यासक्रमावर आधारित आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ आहे. पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाने केलेल्या नियोजनानुसार 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून तृतीय 'वर्ष कला'व्या जनरल पेपर-3 साठी 'विसाव्या शतकातील जगाचा इतिहास' (1941-1992) हा विषय सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात पाच प्रकरणे तर दुसऱ्या सत्रात चार प्रकरणे अशी एकूण नऊ प्रकरणे आहेत. त्यांपैकी पहिले प्रकरण 'संकल्पनांचा अभ्यास’ हे असून त्यात एकूण बारा संकल्पनांवर लेखन केले आहे. दुसरे प्रकरण पहिले महायुद्ध हे असून त्यात सुरुवातीला कारणे व परिणाम यांवर चर्चा केली असून पॅरिस शांता परिषद आणि राष्ट्रसंघाच्या कार्याचे टीकात्मक परीक्षण केले आहे. तिसरे करण रशियन राज्यक्रांतीचे असून त्यात सुरुवातीस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पार्श्वभूमी विशद केली आहे. या क्रांतीतील लेनिनचे योगदान देताना त्याचे नवीन आर्थिक धोरण तसेच स्टॅलिन व त्याच्या काळातील पंचवार्षिक योजनांवर प्रकाश टाकला आहे. चौथे प्रकरण हुकूमशाहीचा उदय हे असून त्यात इटली, जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रातील अनुक्रमे मुसोलिनी, हिटलर व केमाल पाशा या हुकूमशहांच्या कारकिर्दीचा सर्वांगीण आढावा घेतला आहे. पाचदे प्रकरण महामंदी हे असून त्याचे स्वरूप, कारणे व परिणामांचे विवेचन करताना महामंदी दूर व्हावी यासाठी तत्कालीन विविध उपाययोजनांची सविस्तर चर्चा केली आहे.

Karmache Vidnyan: कर्माचे विज्ञान

by Dada Bhagwan

कर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति (सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.

Maharashtrartil Sthanika Svarajya Sanstha T.Y.B.A - Pune University

by R. G. Waradkar Nanda Rashinkar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी. ए. भाग - 3 च्या राज्यशास्त्र विषयासाठी जो नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे त्यात 'महाराष्ट्रातील स्थानिक संस्था' हा एक पेपर आहे. त्याला अनसरून प्रस्तुत पुस्तक लिहिलेले आहे. तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयासाठी हे पस्तक उपयुक्त आहेच; तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याठीसुद्धा हे पुस्तक विशेष उपयुक्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती, आकृतिबंध स्थानिक स्वराज्य संस्थांना येणाऱ्या अडचणी, उदयास येणारे नेतृत्व त्याचे सविस्तर विवेचन विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे.

Rajkiya Vicharpranali TYBA Fifth Semester - SPPU: राजकीय विचारप्रणाली टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar Nitin Birbal

राज्यशास्त्रातील राजकीय विचारप्रणाली ही अभ्यासशाखा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वच बदलांचे मूळ विचारप्रणाली असते. विचारप्रणाली व्यक्तीच्या जीवनाला दिशा देते तसेच तिला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते. या विचारप्रणालीच्या महत्त्वामुळे हा अभ्यासक्रम राज्यशास्त्र अभ्यासमंडळाने सुरू केलेला आहे. राष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद, फॅसिझम, फुले-आंबेडकरवाद, गांधीवाद, स्त्रीवाद या महत्त्वपूर्ण विचारप्रणालींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे.

Yugandhar - Novel: युगंधर - कादंबरी

by Shivaji Sawant

हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे.भारतीय समाज व संस्कॄती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमदभागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या काही वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूस-नीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तावापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.! त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती - ‘युगंधर’!!

Mi Kon Aahe - Novel: मी कोण आहे - कादंबरी

by Dada Bhagwan

फक्त जगण्यापलीकडे जीवन काय आहे हे स्वतःला कोणी विचारले नाही? जीवनाचा खरा हेतू काय आहे? फक्त जगण्यापेक्षा उच्च उद्देश असणे आवश्यक आहे. “मी कोण आहे?” या पुस्तकात ज्ञानी पुरुष (स्वत: च्या ज्ञानाचे मूर्तिमंत) दादा भगवान वर्णन करतात की अध्यात्मिक साधकांच्या वयस्क-जुन्या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच अंतिम जीवनाचा हेतू आहे: मी कोण आहे आणि कोण आहे जीवनात घडणार्‍या सर्व गोष्टींचा 'कर्ता'? दादाश्री असेही प्रश्न सोडवतात: “जीवनाच्या प्रवासाचे स्वरूप काय आहे?”, “जगाची निर्मिती कशी झाली?”, “देव कसा शोधायचा?”, “मी स्वतःची शुद्ध आत्मा कशी अनुभवू?”, आणि “मुक्ति म्हणजे काय?” शेवटी, दादाश्री वर्णन करतात की स्वत: चे ज्ञान प्राप्त करणे हे जीवनाचा प्राथमिक हेतू आहे आणि खरोखरच या अध्यात्माची सुरूवात आहे. आत्मज्ञान प्राप्त केल्यावर, आध्यात्मिक विकास सुरू होतो, ज्यानंतर एखाद्या व्यक्तीस अंतिम मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकेल.

Shoonyatun Suryakade - Novel: शून्यातून ‘सूर्या’कडे - कादंबरी

by Arati Datar

प्राचीन भारतातील कालखंडांवर, व्यक्तिमत्त्वांवर आधारित कादंबऱ्या-पुस्तके, अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, सकारात्मक विषय, मनाला उभारी देणारी पुस्तकं प्रकाशित करण्याची आमच्या 'विहंग प्रकाशन संस्थे'ची परंपरा आहे. डॉ. आरती दातार लिखित 'शून्याकडून सूर्याकडे' हे आमच्या परंपरेत बसणारं असंच एक पुस्तक. विपरीत परिस्थितीविरुद्ध यशस्वी लढा देऊन डॉ. अरुण दातारांनी जे विजिगीषू वृत्तीचं दर्शन घडवलं आहे त्याचं साद्यंत वर्णन प्रस्तुत पुस्तकात आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ऐन तिशीच्या उंबरठ्यावर झालेल्या अपघातात डॉ. अरुण यांचा एक पाय पूर्णत: जायबंदी झाला. त्यानंतर त्यांच्यावर झालेले उपचार, वाट्याला आलेला आशा-निराशेचा खेळ, चाळीस टक्के संभाव्य राहणारी शारीरिक असमर्थता, विपरित परिस्थितीशी झगडताना आलेले कडुगोड अनुभव आणि या सर्वांवर समर्थपणानं मात करून आयुष्यात पुन्हा उभे राहिलेले डॉ. अरुण आणि डॉ. आरती दातार यांच्या विषयीचा सारा लेखाजोखा या पुस्तकात स्वत: डॉ. आरती दातार यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या उभयतांनी प्राप्त परिस्थिती आनंदानं स्वीकारली. संकटाशी सामना करून मार्ग काढला; आणि आज ते दोघे आपापल्या क्षेत्रात मोठ्या धडाडीनं उभे राहिले, यशस्वी झाले.

Shriman Yogi - Novel: श्रीमान योगी - कादंबरी

by Ranjit Desai

रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्‌मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्‍यांचा वापर केला आहे. भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजनीतिज्ञ, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.

Bhagavan Buddha Aani Tyancha Dhamma - Novel: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म - कादंबरी

by B. R. Ambedkar

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला. या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हणता येईल. या विशाल ग्रंथात बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये, लेखकाने चार प्रश्नांची सूची दिली आहे.

Mastanicha Bajirao - Novel: मस्तानीचा बाजीराव - कादंबरी

by Muralidhar Javadekar

महाराष्ट्राचा दुसरा शिवाजी अन्धकारमय स्थितीत अन्तर्धान पावत असल्याचे चित्र मनावर खोल जखम करते. बाजीरावाची कथा व मस्तानीची व्यथा प्रा. मुरलीधर जावडेकर यांनी आपल्या समर्थ लेखणीने एक अमर कलाकृती म्हणून या नाटकाच्या रूपाने मराठी वाचकांसमोर मांडली आहे. नाट्याच्या पानोपानी बाजीरावाची मनोव्यथा त्याच्या हृदय पिळवटून निघालेल्या शब्दांत व्यक्त होते. छत्रपतींच्या दरबारी बाजीरावाबद्दल किल्मिष ओतणारे स्वर्थलंपट मुत्सद्दी, त्यांचे विचार आणि बाजीरावाची धडाडी यांतील भेद उत्कृष्टपणे उकलून दाखविला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक उत्कट भावमधुर पण अंती करुण अशा बाजीराव व मस्तानी यांच्या नितांत सुंदर प्रेमकथेवर आधारलेले पण त्या कथेचे शृंगार, शौर्य, त्यात यांचे पापुद्रे अलगद बाजूस करून आतील करुण, दाहक मनोव्यथेचे असंख्य थर नाजुकपणे उकलून एका शोकांतिकेच्या मुळाशी जाऊन ते कौशल्याने वाचकांसमोर लेखकाने नाटकाच्या रुपाने ठेवले आहे.

The Gospel In Brief - Novel: द गॉस्पेल इन ब्रीफ़ - कादंबरी

by Leo Tolstoy

लिओ टॉलस्टॉय लिखित गॉस्पेल इन ब्रीफ़ या पुस्तकाचे मराठी अनुवाद फ्रान्सिस आल्मेडा यांनी केलेले आहे. पुस्तकामध्ये प्रभू येशू यांनी कशाप्रकारे ख्रिस्ती धर्म प्रसार केला व त्यांना आलेल्या अडचणी आणि लोकांचा त्यांना मिळालेला प्रतिसाद व तिरस्कार, त्यांची कश्याप्रकारे हत्या केली गेली हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Refine Search

Showing 76 through 100 of 113 results