‘१९८४’ हे पुस्तक अशाचपैकी एक आहे. जॉर्ज ऑरवेलने १९४८ साली हे पुस्तक लिहिले. भविष्यकाळातील सर्वंकष हुकूमशाहीचे चित्रण त्यात केले आहे. या पुस्तकाचा बोलबाला सर्व जगात जसा झाला, तसाच तो महाराष्ट्रातही झाला. ३६ सालात जगातील सुमारे ६२ भाषांत या पुस्तकाची भाषांतरे झाली. मराठीत मात्र मी या पुस्तकाचे केलेले भाषांतर प्रसिद्ध होण्यासाठी ३१ डिसेंबर १९८४ ही तारीख उजाडावी लागली. तेव्हा कुठे मराठी भाषा ही भाषांतराच्या यादीत ६३वी भाषा ठरली. त्या वेळी प्रकाशन समारंभाला श्री. ग. प्र. प्रधान (समाजवादी), श्री. ना. ग. गोरे (समाजवादी), श्री. प्रभाकर उर्ध्वरेषे (कम्युनिस्ट) इत्यादी राजकीय नेते उपस्थित होते. त्यांनी या पुस्तकाची मुक्त कंठाने स्तुती केली. १९८४ सालानंतर २७ वर्षांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती बाजारात येत आहे. जॉर्ज ऑरवेलने म्हणतात की, आणीबाणीत अनेक प्रकाशकांना मी विचारले असता या पुस्तकाचे भाषांतर प्रसिद्ध करण्यास ते कचरले. त्यामागे भीती होती अन् ही भीती हीच हुकूमशहाची शक्ती असते. हुकूमशाही म्हणजे नेमके काय, हे ऑरवेलने यात दाखवले आहे. भीतीचा वापर केल्यावरही हुकूमशहाचे समाधान होत नाही. त्याला जनतेने स्वेच्छेने त्याच्यावर प्रेम करावे, त्याची भक्ती करावी असे वाटत असते. कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान हा केवळ हुकूमशहा बनण्यासाठी घेतलेला आधार असतो. ‘खरी हुकूमशाही माणसाच्या रक्तातच असते काय?’ असा प्रश्न हे पुस्तक वाचल्यावर वाचकाला नक्की पडेल. तसेच हूकूमशाही अगदी टोकाला गेल्यावर काय काय घडू शकते, हे या पुस्तकात फार चांगले दर्शवले आहे.