कर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति (सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.