गणित भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.