भूगोल इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण नऊ अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीस पाठाचा मुद्देसूद सारांश दिला आहे. सारांशात बऱ्याच ठिकाणी भारत व ब्राझील या देशांचा तौलनिक अभ्यास समजून घेण्यास सोपे व्हावे, यासाठी सारण्या दिल्या आहेत. प्रत्येक पाठात असणारे स्वाध्यायांतील प्रश्न व इतरत्र असणारे अनेक महत्त्वाचे अधिकचे प्रश्न अचूक उत्तरांसहित दिलेले आहेत. तसेच बोर्डाने प्रसारित केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांतील बहुतांशी प्रश्न आणि मार्च २०१९ च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आदर्श उत्तरांसह समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठात नकाशाशी मैत्री, चर्चा करा, पाहा बरे जमते का?, सांगा पाहू!, करून पाहा, शोधा पाहू !, जरा विचार करा, जरा डोके चालवा, द्वैताचे रंग असे शीर्षक असलेल्या अनेक चौकटी दिल्या आहेत. या चौकटींतील विषयांवर आधारित विविध प्रश्नांचा अचूक उत्तरांसहित या 'नवनीत'मध्ये यथायोग्य ठिकाणी समावेश करण्यात आला आहे.