Browse Results

Showing 51 through 75 of 112 results

Mann Mein Hain Vishwas - Novel: मन में है विश्वास - कादंबरी

by Vishwas Nangre Patil

ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक 'एकलव्यां'ना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे.

Manus Mhanun Jaganyasathi - Novel: माणूस म्हणून जगण्यासाठी - कादंबरी

by Vivek Pandit

माणूस म्हणून जगण्यासाठी हे पुस्तक स्वातंत्र्य, असंघटितांची संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून दुर्बलांना सामर्थ्यवान बनविण्याच्या प्रक्रियेवर आधारित आहे. विकासाची नेमकी व्याख्या समजून घेतल्याशिवाय या प्रक्रियेचे आकलन होणार नाही. रस्ते, पूल, उड्डाणपूल, गगनचुंबी इमारती, दूरसंचार व संपर्काची साधने, वीज निर्मितीचे नेत्रदीपक प्रकल्प, गोल्फ क्लब, झगझगते मॉल्स, विशेष आर्थिक क्षेत्र यावर विकास तोलला असता भ्रामक चित्र उभे राहते. स्थिरावलेल्या पारंपरिक अर्थव्यवस्थेला धक्के देत आधुनिक अर्थव्यवस्था गती घेत असल्याचे यावरून स्पष्ट होते, यात शंका नाही. खरा विकास या प्रगतीच्या पलीकडे व अधिक मूलभूत असतो. अन्न, आरोग्य, शिक्षण, पाणी, लसीकरण, पोषण, स्वच्छता, वीज या पलीकडे मानवी मनाचा स्वातंत्र्य व सहजतेच्या वातावरणात झालेला विकास म्हणजेच खरा विकास होय. अन्याय-अत्याचाराला मूक संमती असणे, शोषणासमोर गुडघे टेकणे, यथास्थिती मान्य करणे, गुलामीचे जिणे निमूटपणे स्वीकारणे, या व अशा शांततेच्या संस्कृतीचे परिवर्तन हाच विकासाचा मार्ग आहे.

Manusaki - Novel: माणुसकी - कादंबरी

by Shri. Shripad Nagnath Rautwad

सामाजिक जीवनात हा मानव आईवडील सारख्या आपल्या मुख्य घटकांना देखील आज वृद्धाश्रमात सोडू लागला आहे, नातलग, गणगोत, आपुलकी, प्रेम, भावना, परोपकार, हे माणुसकीच्या घटकांना ठोकर देत हा मानव प्राणी आज या समाजात जीवन जगत आहे. त्यातच मानवांच्या निर्मितीचा गूढ असलेल्या निसर्गापासूनही हा मानव दूर झाला आहे. निसर्गाची कत्तल करू लागला. डिसीटल च्या दुनीयेत स्वतः डिजीटल झालाच, मात्र समाजालाही डिजीटल करत सुटला आहे. अश्या असंख्य मानवतेच्या पैलूंना माझ्या लेखणीतून स्पर्शून गेललेला हा 'माणुसकी' आपल्या हाती सोपवत आहे.

Manusmruti - Novel: मनुस्मृति - कादंबरी

by Shri. Ashok Kothare

अशोक कोठारे लिखित मनुस्मृति या पुस्तकामध्ये मुनुस्मृती चे भाषांतर मराठी भाषेत केले असून त्यांनी या पुस्तकामध्ये चार वर्ण सांगितलेले आहेत त्यामध्ये ब्राम्हण हा सर्वश्रेष्ठ दाखवला आहे व चार वर्णांचे नियम व रूढी परंपरा त्यामध्ये आहेत. यामध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे चार वर्ण सांगितले आहेत.

Marathi Balbharati class 4 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित झालेली आहे. इयत्ता चौथीमध्ये त्याला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता यावीत, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचनासाठी विविध साहित्य प्रकारांची निवड केलेली आहे. निवड करताना मुलांचे भावविश्व, अनुभव, परिसरातील घटना व प्रसंग यांचा विचार केला आहे. गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये यांचा अंतर्भाव पाठांतील आशयात तसेच स्वाध्याय, भाषिक कृती, उपक्रम व प्रकल्पांत केलेला आहे. विविध भाषिक कृतींच्या माध्यमातून शिकताना विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती सहजतेने करू शकतील व यातूनच त्यांचा भाषिक विकासही साधता येईल.

Marathi Balbharati class 5 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पाठ व कविता मिळून संत्तावीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठपुस्तकात विद्यार्थ्यांना घर व परिसरातील व्यक्तींशी घटना-प्रसंगानुरूप बोलता यावे, स्वच्छता, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांवर विचार करायला ते प्रवृत्त व्हावे, यासाठी पाठ्यपुस्तकांत प्रसंगचित्रे दिली आहेत. चित्रांचे निरीक्षण, त्यांवर विचार, चर्चा व त्यासंबंधी स्वतःचे अनुभवकथन यांतून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती निर्माण होईल. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, खेळ खेळूया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी' या शीर्षकाखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव दिला आहे.

Marathi Balbharti class 2 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता दुसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता दुसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पुस्तकातील चित्रे पाहा. चित्रामधील वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी आणि माणस यांच्याशी बाला. चित्रातील गोष्टी समजावून घ्या आणि वर्गातील मित्र-मैत्रिणींना सागा. सगळ्यांनी मिळून गाणी म्हणा. पाठ वाचा. वाचता-वाचता समजून घ्या, पाठाखाली वगवगळ्या कृता दिल्या आहत. त्या गमतीदार आहेत. पाठ वाचला, की पाठाखालील कृतींची उत्तरे मिळतील आणि पाठहा अधिक चागल्याप्रकारे समजेल. त्यामधून वाचन-लेखन शिकताना खूप मजा यईल.

Marathi Balbharti class 6 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या भावविश्‍वातील पाठ व कवितांचा समावेश पाठ्यपुस्तकात केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी, सारे हसूया, वाचा, ओळखा पाहू, विचार करून सांगूया, भाषेची गंमत पाहूया' या शीर्षकांखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यांस वाव दिला आहे. 'आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली व्याकरण घटकांची सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे.

Marathi class 7 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड.

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो.

Marathi Kumarbharati Digest class 10 - Maharashtra Board Guide: मराठी कुमारभारती डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी कुमारभारती इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पुस्तकामध्ये चार भाग दिले आहेत. पाठ्यपुस्तकातील सर्व पाठ, कविता व स्थूलवाचनाचे पाठ यांवर कृतिपत्रिका आराखड्यानुसार विविध कृती या नवनीतमध्ये दिल्या आहेत. कृतिपत्रिकेच्या आराखड्यातील अद्ययावत बदलांनुसार 'कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती' या प्रश्नप्रकाराचे मार्गदर्शन देऊन, तो सर्व कवितांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत 'नवनीत'मध्ये दिलेल्या अपठित उताऱ्यांच्या स्वतंत्र विभागात पाठ्यपुस्तकात दिलेले दोन अपठित उतारे, तसेच सरावासाठी अन्य उतारे आणि त्यावर आधारित आराखड्यानुसार अपेक्षित कृतींचा समावेश केलेला आहे.

Marathi Sulabhbharti class 6 - Maharashtra Board

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी सुलभभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालकेंद्रित असावी, स्वयंअध्ययनावर भर दिला जावा, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आनंददायी व्हावी असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या क्षमता प्राप्त कराव्यात त्यासाठी पाठ्यपुस्तकात भाषाविषयक अपेक्षित क्षमता विधानांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात पाठ व कवितांचा समावेश केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिकाधिक विकसित होण्यासाठी 'सुविचार', 'वाचू आणि हसू', 'वाचा', 'घोषवाक्ये', 'ओळखा पाहू', 'शब्दकोडी' यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनी नवीन शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर सहजतेने करावा, तसेच त्यांच्यामध्ये व्याकरणविषयक जाण निर्माण व्हावी, म्हणून हे सर्व मनोरंजक व सोप्या पद्धतीने दिले आहे. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पकता वापरून लेखन करता यावे, विचार व्यक्त करता यावे, यांसाठी वैविध्यपूर्ण प्रश्न व कृती पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

Marathi Yuvakbharati class 11 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी युवकभारती इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात पाच विभाग आहेत. या पाठ्यपुस्तकातून विविध साहित्यप्रकारांची ओळख तर होणार आहेच, शिवाय अनेक जुन्या-नव्या साहित्यिकांची लेखनशैली तुम्हांला अभ्यासता येणार आहे. साहित्यप्रकार म्हणून 'नाटक' या साहित्यप्रकाराचा थोडक्यात परिचय आणि तीन नाट्यउतारे पाठ्यपुस्तकात दिले आहेत. 'दृक्-श्राव्य साहित्यप्रकार' याचा अभ्यास करणार आहात. पुस्तकात व्याकरण घटकांची मांडणी कार्यात्मक पद्धतीने केली आहे. उपयोजित लेखन विभागात अंतर्भूत केलेले घटक हे कालसुसंगत असून, या घटकांच्या अध्ययनातून अनेक व्यावसायिक संधी तुमच्या दृष्टिक्षेपात येऊ शकतील.

Marathi Yuvakbharati class 12 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी युवकभारती इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सहा विभाग आहेत. पहिल्या दोन विभागातील गद्य-पद्यपाठांच्या माध्यमातून नामवंत साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींचा परिचय करून घेता घेता त्या साहित्यांमधील संस्काराने भाषा ही उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल. हे साहित्य तुमच्या वैचारिक आणि कल्पनाशक्तीच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. या साहित्यामधील आशय तुम्हांला आजच्या जीवनातील समस्यांची जाणीव करून देईल तसेच साहित्यिक कृतींमधील सौंदर्याचा आनंद घेत आपले जीवन अनुभवसमृद्ध करण्याचा वस्तुपाठही तुम्हांला मिळेल. चित्रांमुळे पाठ्यपुस्तकाचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. त्यामुळे आशयाचे आकलन अर्थपूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होईल.

Marathi Yuvakbharati Digest class 11 - Maharashtra Board Guide: मराठी युवकभारती डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी युवकभारती इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात एकूण पाच भाग दिलेले आहेत. त्यापैकी गद्य, पद्य, साहित्यप्रकार (नाटक), उपयोजित मराठी व व्याकरण. प्रत्येक गद्यपाठाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात लेखक/लेखिका व कवी/कवयित्री यांचा परिचय – लेखनवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांचा उल्लेख करून पुढे पाठाचा परिचय – शब्दार्थ – टिपा – वाक्प्रचार व अर्थ - कृति - स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे या क्रमाने पाठाचा सुसंगतवार अभ्यास करून दिला आहे. मार्गदर्शकात प्रत्येक नाट्यउताऱ्यावरील कृति-स्वाध्याय अचूक व समर्पक पद्धतीने सोडवून दिले आहेत. मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक कार्यात्मक व्याकरण घटकाचा यथायोग्य परामर्श घेऊन, सुबोध भाषेत समजावून देऊन प्रत्येक घटकासाठी दिलेल्या कृति-स्वाध्यायाची अचूक व समर्पक उत्तरे दिली आहेत.

Mastanicha Bajirao - Novel: मस्तानीचा बाजीराव - कादंबरी

by Muralidhar Javadekar

महाराष्ट्राचा दुसरा शिवाजी अन्धकारमय स्थितीत अन्तर्धान पावत असल्याचे चित्र मनावर खोल जखम करते. बाजीरावाची कथा व मस्तानीची व्यथा प्रा. मुरलीधर जावडेकर यांनी आपल्या समर्थ लेखणीने एक अमर कलाकृती म्हणून या नाटकाच्या रूपाने मराठी वाचकांसमोर मांडली आहे. नाट्याच्या पानोपानी बाजीरावाची मनोव्यथा त्याच्या हृदय पिळवटून निघालेल्या शब्दांत व्यक्त होते. छत्रपतींच्या दरबारी बाजीरावाबद्दल किल्मिष ओतणारे स्वर्थलंपट मुत्सद्दी, त्यांचे विचार आणि बाजीरावाची धडाडी यांतील भेद उत्कृष्टपणे उकलून दाखविला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक उत्कट भावमधुर पण अंती करुण अशा बाजीराव व मस्तानी यांच्या नितांत सुंदर प्रेमकथेवर आधारलेले पण त्या कथेचे शृंगार, शौर्य, त्यात यांचे पापुद्रे अलगद बाजूस करून आतील करुण, दाहक मनोव्यथेचे असंख्य थर नाजुकपणे उकलून एका शोकांतिकेच्या मुळाशी जाऊन ते कौशल्याने वाचकांसमोर लेखकाने नाटकाच्या रुपाने ठेवले आहे.

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) - MIE

by Mauritius Institute of Education

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) Textbook Mauritius Institute of Education.

Mi Abhimanyu - Novel: मी अभिमन्यू - कादंबरी

by Satishkumar Patil

डॉ. सतिशकुमार पाटील लिखित मी अभिमन्यू या पुस्तकात मृत्यू समोर उभा असताना मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो. मृत्यू दारात उभा आहे तेव्हा त्या अभिमन्यूच्या मनात आलेले विचार, त्या विचारातून मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ याचे सुंदर मंथन हे सविस्तर कांदबरीमध्ये दाखवले आहे.

Mi Kon Aahe - Novel: मी कोण आहे - कादंबरी

by Dada Bhagwan

फक्त जगण्यापलीकडे जीवन काय आहे हे स्वतःला कोणी विचारले नाही? जीवनाचा खरा हेतू काय आहे? फक्त जगण्यापेक्षा उच्च उद्देश असणे आवश्यक आहे. “मी कोण आहे?” या पुस्तकात ज्ञानी पुरुष (स्वत: च्या ज्ञानाचे मूर्तिमंत) दादा भगवान वर्णन करतात की अध्यात्मिक साधकांच्या वयस्क-जुन्या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच अंतिम जीवनाचा हेतू आहे: मी कोण आहे आणि कोण आहे जीवनात घडणार्‍या सर्व गोष्टींचा 'कर्ता'? दादाश्री असेही प्रश्न सोडवतात: “जीवनाच्या प्रवासाचे स्वरूप काय आहे?”, “जगाची निर्मिती कशी झाली?”, “देव कसा शोधायचा?”, “मी स्वतःची शुद्ध आत्मा कशी अनुभवू?”, आणि “मुक्ति म्हणजे काय?” शेवटी, दादाश्री वर्णन करतात की स्वत: चे ज्ञान प्राप्त करणे हे जीवनाचा प्राथमिक हेतू आहे आणि खरोखरच या अध्यात्माची सुरूवात आहे. आत्मज्ञान प्राप्त केल्यावर, आध्यात्मिक विकास सुरू होतो, ज्यानंतर एखाद्या व्यक्तीस अंतिम मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकेल.

Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी

by Ulhas Hari Joshi

आपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.

Mrutyunjayee - Novel: मृत्युंज़यी - कादंबरी

by Ratnakar Matkari

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्‍याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्‍या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.

Muktipatha: मुक्तिपथ

by Ashok Tapase Harshada Tapase

मुक्तिपथ या पुस्तकामध्ये विश्वाची आजची परिस्थिीती पाहून अनेकदा अनेकांना असे वाटते, "युद्ध नको बुद्ध हवा" पण बुद्ध म्हणजे नक्की काय हे या पुस्तकामधून शिकवले आहे. यामध्ये बुद्धांची शिकवण दिली आहे. बुद्धांचे विचार, सुखाचा, मुक्तीचा मार्ग, 'तिपिटक' या पुस्तकात सांगितले आहेत.

Nyay - Novel: न्याय - कादंबरी

by Jagdish Khandewale

हजार लोकांची सभा आठ दहा जण उधळून लावू शकतात. खरे म्हणजे जमलेल्या लोकांचा नुसत्या हुंकाराने हे गर्भगळीत होऊ शकतात पण ते तसे करीत नाही म्हणूनच यांचे फावते. पगारवाढ आणि सवलती करता जागृत असण्याऱ्या संघटना, संस्थेतील गैरकारभाराबद्दल मौन बाळगून असतात. कोणी एकट्याने याविरोधात आवाज उठविल्यास त्याला गप्प करण्यात येते. गप्प झालाच नाही तर त्यालाच आरोपी ठरविण्यात येते आणि न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठविण्यात येते. दुर्जन व्यक्ती फार बुद्धिमान असतात असे काही नसते. सज्जन माणसे चाकोरी बाहेर वागत नाहीत, असंघटित असतात याचा गैरफायदा दुर्जनांना मिळतो एवढेच. अशाच व्यवस्थेचा एक बळी, नरेन. संधी एकदाच दार ठोठावते असे म्हणतात. नरेनने या संधीचा पूर्ण फायदा घेतला पण ते तेवढे सोपे नव्हते. ही वास्तवाशी जवळिक साधणारी, मनोरंजक आणि विषयांचे वैविध्य राखणारी कथा आहे.

Parisar Abhyas Bhag 1 class 4 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे आहेत. चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा हा प्रयत्न आहे. या पाठ्यपुस्तकात 'सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', अशा शीर्षकाखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. कालानुरूप आणि आशयसुसंगत अशी जीवनमूल्येही विद्यार्थ्यांवर सहजपणे बिंबवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे.

Parisar Abhyas Bhag 1 class 5 - Maharashtra Board: परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास भाग १ इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पंचवीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात आशयाला अनुरूप अनेक रंगीत चित्रे व नकाशे दिले आहेत. या पाठ्यपुस्तकात ‘सांगा पाहू', 'करून पहा', 'जरा डोके चालवा', 'वाचा व विचार करा', अशा शीर्षकांखाली कृतीही दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यांशातील संबोध व संकल्पनांचे आकलन व त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. तसेच हे पाठ्यपुस्तक त्यांच्या परिसराचे निरीक्षण करण्यास उद्युक्त करायला लावणारे आहे. पाठ्यांशातील संबोधांची उजळणी व्हावी, स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांत विविधता आणली आहे. या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होणार आहे.

Parisar Abhyas class 3 - Maharashtra Board: परिसर अभ्यास इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

परिसर अभ्यास इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात चित्रभाषेच्या माध्यमातून आशयाचे आकलन आणि ज्ञानाची निर्मिती परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वयंअध्ययनाला प्रेरणा मिळावी म्हणून स्वाध्यायांतही विविधता आणली आहे, आणि या पुस्तकाद्वारे विदयार्थ्यांना त्यांच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिसराची ओळख होईल.

Refine Search

Showing 51 through 75 of 112 results