Browse Results

Showing 1 through 25 of 112 results

Loksankhya Bhugol Paper 1 SYBA Third Semester - SPPU

by Abc

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विशेष स्तरावर हा ‘लोकसंख्या भूगोल’ विषय लागू केला आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने लोकसंख्या ही एक संपदा आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक त्याचबरोबर लोकसंख्याविषयक घटकांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर व वाढीवर होत असतो. त्याहूनच विविध प्रदेशात लोकसंख्येची रचना तयार होते. लोकसंख्या ही एक संपदा असली तरी साधनसंपदेच्या तुलनेत लोकसंख्या जास्त झाल्यास संपदेवर अधिक ताण पडून दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. 'लोकसंख्या' या विषयावर अनेक भाषांमध्ये ग्रंथ उपलब्ध आहेत. लोकसंख्या व भौगोलिक पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करताना आणि आपल्या देशातील लोकसंख्याविषयक अभ्यास मांडणी करताना अतिशय सोप्या भाषेचा वापर करून अभ्यासकांच्या हाती हे पुस्तक देण्याचा हेतू या पुस्तकाने साध्य केला आहे.

RAW Bhartiya Guptacharsansthechi Goodhgatha - Novel: रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा - कादंबरी

by Ravi Amale

‘रॉ’___ रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ’ची अशी कहाणी. बांग्लादेश मुक्तियुद्धाची आणि पाकीस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवयांना पुरुन उरण्याची. ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरुन चालत असतात ही बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तिथे नैतिक-अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘रॉ’च्या अनेक ज्ञान-अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गुढ अंतरंगाचे.

Bhagavan Buddha Aani Tyancha Dhamma - Novel: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म - कादंबरी

by B. R. Ambedkar

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला. या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हणता येईल. या विशाल ग्रंथात बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये, लेखकाने चार प्रश्नांची सूची दिली आहे.

Karmache Vidnyan: कर्माचे विज्ञान

by Dada Bhagwan

कर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति (सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.

Klesh Rahit Jeevan - Novel: क्लेश रहित जीवन - कादंबरी

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल. दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Mi Kon Aahe - Novel: मी कोण आहे - कादंबरी

by Dada Bhagwan

फक्त जगण्यापलीकडे जीवन काय आहे हे स्वतःला कोणी विचारले नाही? जीवनाचा खरा हेतू काय आहे? फक्त जगण्यापेक्षा उच्च उद्देश असणे आवश्यक आहे. “मी कोण आहे?” या पुस्तकात ज्ञानी पुरुष (स्वत: च्या ज्ञानाचे मूर्तिमंत) दादा भगवान वर्णन करतात की अध्यात्मिक साधकांच्या वयस्क-जुन्या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर शोधणे हाच अंतिम जीवनाचा हेतू आहे: मी कोण आहे आणि कोण आहे जीवनात घडणार्‍या सर्व गोष्टींचा 'कर्ता'? दादाश्री असेही प्रश्न सोडवतात: “जीवनाच्या प्रवासाचे स्वरूप काय आहे?”, “जगाची निर्मिती कशी झाली?”, “देव कसा शोधायचा?”, “मी स्वतःची शुद्ध आत्मा कशी अनुभवू?”, आणि “मुक्ति म्हणजे काय?” शेवटी, दादाश्री वर्णन करतात की स्वत: चे ज्ञान प्राप्त करणे हे जीवनाचा प्राथमिक हेतू आहे आणि खरोखरच या अध्यात्माची सुरूवात आहे. आत्मज्ञान प्राप्त केल्यावर, आध्यात्मिक विकास सुरू होतो, ज्यानंतर एखाद्या व्यक्तीस अंतिम मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकेल.

Purandarche Ratna - Novel: पुरंदरचे रत्न - कादंबरी

by Shri. Dattatray Bhapkar

इतिहासात अनेक शुर-वीर जन्माला आले व आपल्या पराक्रमाची ओळख ठेवून गेले. शिवकाळातही अशा अनेक विरांनी आपला पराक्रम गाजविला. अनेक पडद्यासमोर आले, तर काही पडद्यामागेच राहिले. त्यामुळे त्यांचा पराक्रम काही कमी होत नाही. अशाच एका विराची ओळख श्री दत्तात्रय नाथा भापकर यांनी आपल्या या ऐतिहासिक कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी काल्पनिक कथेवर अवलंबून असली तरी, शिवकालात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून “भिकाजी" या विराचे कार्य आहे.

Abhimanachi Leni - Novel: अभिमानाची लेणी - कादंबरी

by Devendra Bhujbal

देवेंद्र भुजबळ यांनी 'अभिमानाची लेणी' या पुस्तकात सावरकर, आंबेडकर यांच्यासोबतच 'राष्ट्रभक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सानेगुरुजींची शाळा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, बुद्ध वंदन, युगप्रवर्तक शाहू महाराज, उत्तम बंडू तुपे अशा महनीय व्यक्तिंची विविध क्षेत्रातील कामगिरीची माहिती वाचकांसमोर मांडली आहे.

Rajkiya Vicharpranali TYBA Fifth Semester - SPPU: राजकीय विचारप्रणाली टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar Nitin Birbal

राज्यशास्त्रातील राजकीय विचारप्रणाली ही अभ्यासशाखा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वच बदलांचे मूळ विचारप्रणाली असते. विचारप्रणाली व्यक्तीच्या जीवनाला दिशा देते तसेच तिला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते. या विचारप्रणालीच्या महत्त्वामुळे हा अभ्यासक्रम राज्यशास्त्र अभ्यासमंडळाने सुरू केलेला आहे. राष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद, फॅसिझम, फुले-आंबेडकरवाद, गांधीवाद, स्त्रीवाद या महत्त्वपूर्ण विचारप्रणालींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे.

10 Advanced Short Stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

The Advance level book of short stories from Pratham books, used in the ACR project, Pune.

10 Basic short stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

10 Basic level short stories in Full text with Human Narration, selected from Pratham books for the ACR project in Pune.

10 Intermediate short stories from Pratham Books for ACR Project

by Pratham Books

This is the 2nd part of selected stories in Full text with Human narrated audio, from Pratham books, which are used for the ACR project in Pune.

Suryaputra Lokmanya - Novel: सूर्यपुत्र लोकमान्य - कादंबरी

by Smita Damle

लोलकातून (प्रिझम् मधून) सूर्यकिरणं आरपार गेली की त्यातले सप्तरंग उजळून निघतात. कै.सदाशिव विनायक बापट यांच्या लोकमान्य टिळकांच्या ‘आठवणी आणि आख्यायिका' या दोन खंडांचंही तसंच आहे. स. वि. बापटांनी चिवटपणे, अफाट मेहनत घेऊन ह्या आठवणींच्या रूपाने लोकमान्यांना आपल्यासमोर कायमचं जिवंत केलं. त्याचाच आढावा घेत ही कांदबरी डॉ. स्मिता दामले यांनी वाचकांसमोर आणली आहे.

Shoonyatun Suryakade - Novel: शून्यातून ‘सूर्या’कडे - कादंबरी

by Arati Datar

प्राचीन भारतातील कालखंडांवर, व्यक्तिमत्त्वांवर आधारित कादंबऱ्या-पुस्तके, अभिजात विषयांवरील कादंबऱ्या, सकारात्मक विषय, मनाला उभारी देणारी पुस्तकं प्रकाशित करण्याची आमच्या 'विहंग प्रकाशन संस्थे'ची परंपरा आहे. डॉ. आरती दातार लिखित 'शून्याकडून सूर्याकडे' हे आमच्या परंपरेत बसणारं असंच एक पुस्तक. विपरीत परिस्थितीविरुद्ध यशस्वी लढा देऊन डॉ. अरुण दातारांनी जे विजिगीषू वृत्तीचं दर्शन घडवलं आहे त्याचं साद्यंत वर्णन प्रस्तुत पुस्तकात आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ऐन तिशीच्या उंबरठ्यावर झालेल्या अपघातात डॉ. अरुण यांचा एक पाय पूर्णत: जायबंदी झाला. त्यानंतर त्यांच्यावर झालेले उपचार, वाट्याला आलेला आशा-निराशेचा खेळ, चाळीस टक्के संभाव्य राहणारी शारीरिक असमर्थता, विपरित परिस्थितीशी झगडताना आलेले कडुगोड अनुभव आणि या सर्वांवर समर्थपणानं मात करून आयुष्यात पुन्हा उभे राहिलेले डॉ. अरुण आणि डॉ. आरती दातार यांच्या विषयीचा सारा लेखाजोखा या पुस्तकात स्वत: डॉ. आरती दातार यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. या उभयतांनी प्राप्त परिस्थिती आनंदानं स्वीकारली. संकटाशी सामना करून मार्ग काढला; आणि आज ते दोघे आपापल्या क्षेत्रात मोठ्या धडाडीनं उभे राहिले, यशस्वी झाले.

Radhey - Novel: राधेय - कादंबरी

by Ranjit Desai

"राधेय’ ही रणजित देसाईंची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. प्रास्ताविकेत देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं ? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.

Shriman Yogi - Novel: श्रीमान योगी - कादंबरी

by Ranjit Desai

रणजित देसाईंची महत्त्वाकांक्षी कादंबरी म्हणजे ‘श्रीमानयोगी’. शिवाजी महाराजांसारख्या अष्टपैलू, अष्टावधानी युगपुरुषाची व्यक्तिरेखा उभी करणे हे प्रचंड मोठे आव्हानच. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत इतिहासकारांचे दृष्टिकोन वेगळे. अशा अडचणीच्या वाटातून मार्ग काढून ललित वाङ्‌मयाच्या रूपात महाराजांना साकार करण्याचे काम जिकरीचे, त्यातून शिवाजी माहाराजांची ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. मराठी ऐतिहासिक कादंबरीच्या प्रांतात महाराजांना मराठी ललित वाङ्‌मयात वास्तवरूपात प्रथम चित्रित करण्याचे श्रेय निश्चितच रणजित देसाई यांचे आहे. श्रीमानयोगी वाचतानाही महाराजांची जी प्रतिमा नजरेसमोर उभी राहते. त्यातून इतिहास व काल्पनिकता वेगळी काढता येत नाही. ही कादंबरी लिहीताना देसाईंनी शिवाजीराजांबद्दलचा इतिहास, कल्पित दंतकथा, आख्यायिका या सार्‍यांचा वापर केला आहे. भारताच्या किंबहुना जगाच्या इतिहासाचे अवलोकन केले तर नव्याने राज्य निर्माण करणारे थोर राजे, सेनानी आपणांस आढळतील. त्या प्रत्येक प्रसंगात नेभळट राजास पदच्युत करून आपले राज्य प्रस्थापित केलेले आढळते. येथे निर्मात्याला राज्याची सर्व व्यवस्था, सेना हातात आयती मिळालेली आहे व त्याच्या जोरावर प्रस्थापित राज्य उधळून जेत्याने स्वतःचे राज्य स्थापन केले. महाराजांच्या बाबतीत त्यांनी शुन्यातून सुरवात केली आहे. चार बलाढ्य सत्तांचे राज्य कोरत महाराजांनी आपले स्वराज्य उभारण्यास सुरवात केली. या सत्ता बलाढ्य होत्या. राजनीतिज्ञ, युद्धशास्त्रात पारंगत होत्या. अशा शत्रूंशी अखंड झुंजत महाराजांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. असे कर्तृत्त्व दाखवणारा दुसरा राजा इतिहासात आढळत नाही. इथेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे अलौकिकत्त्व सिद्ध होते. प्रजाहितदक्ष राजा, थोर सेनानी, मुत्सद्दी, धर्मसहिष्णू या सर्व विशेषणांमधील महाराजांच्या तोडीची दुसरी व्यक्ती आढळत नाही. महाराजांचे राजकीय कर्तृत्व, संघर्ष, वेदना यांचे सुयोग्य प्रकटीकरण ‘श्रीमानयोगी’ मध्ये झालेले आहे. या कादंबरीत महाराजांच्या व्यक्तित्त्वाचा होणारा विकास क्रमाक्रमाने उदात्ततेकडे घडत गेलेला आढळून येतो.

Abhyantar - Novel: अभ्यंतर - कादंबरी

by Vinita Deshpande

अभ्यंतर या कादंबरीचे विशेष म्हणजे ती समाजव्यवस्थेवर आधारित असून आजच्या काळात या विषयावर विचार करायला लवणारी आहे. सम्राट अशोकने अखंड भारतावर दीर्घकाळ राज्य केले. तो एक शूरवीर योद्धा तर होताच, एक अनुशासित आणि सुनियोजित शासनव्यवस्थेसाठी त्याने केलेले प्रयत्न या कादंबरीत मांडले आहे. कलिंगयुद्धानंतर सम्राट अशोकच्या जीवनाचा या कथानकात घेतलेला आढावा, त्याची मनस्थिती, समस्त भारतात सर्वधर्मसमभाव साधण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न आणि ज्ञानकोशाची गुंफण लेखिकेने लीलया गुंफली आहे. कथानकातील भाषाप्रयोग तुम्हाला गतकाळात घेऊन जातो.

Chetkin - Novel: चेटकीण - कादंबरी

by Narayan Dharap

गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित "चेटकीण' ही कादंबरी. अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणाऱ्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

Amrutbindu - Novel: अमृतबिंदू - कादंबरी

by Ravindra Fadake

रवींद्र फडके लिखित अमृतबिंदू या पुस्तकामध्ये संत तुकाराम महाराज यांचे अभंग व त्याचे अर्थ आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांमधे विविध भावनांचे आविष्करण आढळते, जसे पांडुरंगाबद्दल उत्कट प्रेम, वैराग्य,भक्ती, महाराजांचे विविध अनुभव ईत्यादी. तसेच अभगांमधे अध्यात्माचे विविध पैलू उदाहरणार्थ विविध भक्तीमार्ग, भगवंताच्या भेटिसाठी आवश्यक असणारे प्रेम, वैराग्य, श्रद्धा ईत्यादी भाव; मुख्यत: नामस्मरण हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Jhunj Sangharsh Jivanacha - Novel: झुंज संघर्ष जीवनाचा - कादंबरी

by Govind Gadhari

लेखकाच्या स्वत:च्या जीवनातील सत्य घटीत घटनांवरील हे लिखाण आहे. दुर्गम भागात रानोमाळ भटकंती करणाऱ्या असंघटित समाजातील एका दुर्बल आणि दुबळ्या कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीच्या जीवनात बालपणापासून ज्या संकटमय घटना घडल्या त्या त्याने अनुभवल्या व त्यांना ते कस कसे सामोरे गेले आणि त्यात त्यांनी अनुभवलेली, झेललेली संकटे व त्यावर कशी मात केली त्याचे त्यांनी गावरान मराठी भाषेत कथन केले आहे. प्रदीर्घ काळापर्यंतची त्यांची सत्य घटनांवर आधारीत अशी ही झुंज आहे.

Satyache Prayog Athava Atmakatha - Novel: सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा - कादंबरी

by Mohandas K. Gandhi

महात्मा गांधींच्या आत्मकथेच्या मराठी अनुवादाची ही तिसरी आवृत्ती नवजीवन ट्रस्टतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा ग्रंथ हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी भाषांतून नवजीवन ट्रस्टने वाचकांना उपलब्ध करून दिलाच आहे. आज तो मराठी भाषेत देखील उपलब्ध आहे. श्री. आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपला मराठी अनुवाद प्रसिद्ध करण्याची आम्हाला परवानगी दिली, याबद्दल त्यांचे आभारी आहोत. ग्रंथाचे शेवटी छोटीशी विषयसूची जोडण्यात आली आहे. त्यामुळे वाचकवर्गाची चांगली सोय होईल, अशी आशा आहे. महाराष्ट्रीय वाचकवर्ग पूर्वीप्रमाणे या आवृत्तीचाही यथायोग्य परामर्श घेईल, असा भरवसा वाटतो. ही चौथी आवृत्ती वाचकांपुढे ठेवताना आम्हास आनंद वाटतो. गांधीशताब्दी निमित्त मराठी जनता ह्या ग्रंथाचे प्रकर्षाने स्वागत करील, अशी आम्हास आशा आहे. ह्यातील शुद्धलेखन मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेल्या आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केलेल्या नियमावलीस धरून आहे.

Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) MAR 210 S.Y.B.A. Y.C.M.O.U

by Rajan Gavas Dr Mangala Warkhede Dr Dilip Dhondage

MAR 210 Vanmayprakarancha Abhyas (Katha-Kadambari) text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

Mastanicha Bajirao - Novel: मस्तानीचा बाजीराव - कादंबरी

by Muralidhar Javadekar

महाराष्ट्राचा दुसरा शिवाजी अन्धकारमय स्थितीत अन्तर्धान पावत असल्याचे चित्र मनावर खोल जखम करते. बाजीरावाची कथा व मस्तानीची व्यथा प्रा. मुरलीधर जावडेकर यांनी आपल्या समर्थ लेखणीने एक अमर कलाकृती म्हणून या नाटकाच्या रूपाने मराठी वाचकांसमोर मांडली आहे. नाट्याच्या पानोपानी बाजीरावाची मनोव्यथा त्याच्या हृदय पिळवटून निघालेल्या शब्दांत व्यक्त होते. छत्रपतींच्या दरबारी बाजीरावाबद्दल किल्मिष ओतणारे स्वर्थलंपट मुत्सद्दी, त्यांचे विचार आणि बाजीरावाची धडाडी यांतील भेद उत्कृष्टपणे उकलून दाखविला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक उत्कट भावमधुर पण अंती करुण अशा बाजीराव व मस्तानी यांच्या नितांत सुंदर प्रेमकथेवर आधारलेले पण त्या कथेचे शृंगार, शौर्य, त्यात यांचे पापुद्रे अलगद बाजूस करून आतील करुण, दाहक मनोव्यथेचे असंख्य थर नाजुकपणे उकलून एका शोकांतिकेच्या मुळाशी जाऊन ते कौशल्याने वाचकांसमोर लेखकाने नाटकाच्या रुपाने ठेवले आहे.

Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी

by Ulhas Hari Joshi

आपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.

Pharmacist Tumchya Arogyasathi - Novel: फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी - कादंबरी

by Shri. Ashish Karle

अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे. आरोग्याशी संदर्भात सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्वपूर्ण असतात आणि या सेवा पुरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचा कधी न कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच अगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गरजांपर्यंत__ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शननुसार) औषध वितरित (डिस्पेन्स) करणं एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते. दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू आहेत. फार्मासिस्टच्या अशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे फार्मासिस्ट आणि काय आहे त्याची भूमिका तुमच्या आरोग्यसंदर्भात__

Refine Search

Showing 1 through 25 of 112 results