Browse Results

Showing 26 through 50 of 112 results

Doctor Chanakya - Novel: डॉक्टर चाणक्य - कादंबरी

by Shashank Parulekar

डॉ. शशांक परुळेकर लिखित डॉक्टर चाणक्य या पुस्तकामध्ये लेखकांनी आपला वैद्यकीय क्षेत्राबाबत चा पालकांचा व मुलांचा जो दृष्टीकोन आहे तो कसा असावा व स्वतःचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव लेखकाने याद्वारे सांगितला आहे.

ECO 277 Antararashtriya Arthashastra T.Y.B.A - Y.C.M.O.U

by Sau. Mahajan Vijay Kakade Prof. Dr. Sudhakar Kulkarni

Antararashtriya Arthashastra ECO 277 text book for T.Y.B.A from Yashavantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.

Ganit Bhag 1 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

गणित भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Ganit Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

गणित भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सात पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Ganit class 3 - Maharashtra Board: गणित इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात गणित संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयं-अध्ययन सुलभ व्हाव म्हणून पुस्तकात श्रेणीबद्ध (Graded) 'स्वाध्याय' आणि 'संवादांचा' समावेश करण्यात आला आहे. स्वाध्यायामधील प्रश्न विद्याथ्यानो स्वप्रयत्नाने सोडवावे अशी अपेक्षा आहे. स्वाध्याय कटाळवाण होऊ नयेत यासाठी त्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Ganit class 4 - Maharashtra Board: गणित इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांमध्ये निसर्गत: असलेली चित्रांची आवड आणि स्वत: काहीतरी करण्याची धडपड लक्षात घेऊन हे पुस्तक चित्ररूप आणि कृतिप्रधान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रे शक्यतो बोलकी आणि गणितातील संकल्पना स्पष्ट करण्यास साहाय्यभूत ठरतील अशी आहेत. गणित संबोधांची उजळणी व्हावी, त्यांचे स्थिरीकरण व्हावे, स्वयं-अध्ययन सुलभ व्हावे, म्हणून पुस्तकात श्रेणीबद्ध (Graded) स्वाध्यायांचा समावेश करण्यात आला आहे. स्वाध्यायांमधील प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नाने सोडवावे अशी अपेक्षा आहे. स्वाध्याय कंटाळवाणे होऊ नयेत यासाठी त्यांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पाठाच्या संदर्भात शिक्षकांनी जी भाषा विद्यार्थ्यांसमोर मांडावी अशी अपेक्षा आहे, ती संवादरूपात पाठ्यपुस्तकात दिली आहे.

Ganit class 5 - Maharashtra Board: गणित इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात दोन विभागामध्ये सोळा प्रकरण व त्याचे उदाहरणसंग्रह दिलेले आहेत. या पाठपुस्तकात काही पाठांच्या संदर्भात शिक्षकांनी जी भाषा विद्यार्थ्यांसमोर मांडावी अशी अपेक्षा आहे, ती पाठ्यपुस्तकात संवादरूपात दिली आहे. ज्यांचा वापर विद्यार्थ्यांना गणिताच्या अभ्यासात वारंवार करावा लागतो, असे गुणधर्म व नियम चौकटींत दिले आहेत. तसेच, विचार करा, गणिती कोडी, शोधा म्हणजे सापडेल, खेळ यांचा वापर करून गणित विषय मनोरंजक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पाठ्यपुस्तक जास्तीत जास्त निर्दोष व दर्जेदार व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्राच्या सर्व भागांतील निवडक शिक्षक, तसेच काही शिक्षणतज्ज्ञ व विषयतज्ज्ञ यांच्याकडून या पुस्तकाचे समीक्षण करून घेण्यात आले आहे.

Ganit class 6 - Maharashtra Board: गणित इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थीकेंद्रित असावी, स्वयंअध्ययन प्रक्रियेवर भर दिला जावा, तसेच शिक्षणाची प्रक्रिया रंजक आणि आनंददायी व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात भूमिती, संख्याज्ञान, संख्याप्रणाली, अपूर्णांक, बीजगणित, व्यावहारिक गणित, माहितीचे व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये समाविष्ट असलेल्या संकल्पना सोप्या भाषेत स्पष्ट केल्या आहेत. प्रत्येक पाठ्यघटकाच्या शेवटी सरावासाठी सरावसंच दिले आहेत. या सरावसंचातील उदाहरणांची उत्तरे पाठ्यपुस्तकाच्या शेवटी दिली आहेत. तसेच अध्ययन-अध्यापन प्रभावी होण्यास उपयोगी पडतील असे ‘आय.सी.टी. टूल्स' यांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे.

Ganit class 7 - Maharashtra Board: गणित इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

गणित इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकात काही कृती व रचना दिल्या आहेत त्या जरूर करून पाहा. त्यामधून काही गंमत, नवे गुणधर्म लक्षात येतात का ते पाहा. आपापसात चर्चा करून नवे मुद्दे समजू शकतात. चित्रे, वेन आकृत्या व इंटरनेटच्या साहाय्याने गणित समजणे सोपे होते. हे मुद्दे नीट समजले तर गणित मुळीच अवघड नाही. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक प्रकरण तुम्ही नीट लक्ष देऊन वाचावे अशी अपेक्षा आहे. गणित सोडवण्याची रीत तसेच त्याचे सूत्र का व कसे तयार झाले याचे स्पष्टीकरण या पुस्तकात दिले आहे. त्या रीती वापरून उदाहरणे सोडवण्याचा सराव करा. तो महत्त्वाचा आहे. सरावसंचात दिलेल्या उदाहरणासारखी जास्तीची उदाहरणे तुम्हीही तयार करा. अधिक आव्हानात्मक उदाहरणे या पाठ्यपुस्तकात तारांकित करून दिली आहेत.

The Gospel In Brief - Novel: द गॉस्पेल इन ब्रीफ़ - कादंबरी

by Leo Tolstoy

लिओ टॉलस्टॉय लिखित गॉस्पेल इन ब्रीफ़ या पुस्तकाचे मराठी अनुवाद फ्रान्सिस आल्मेडा यांनी केलेले आहे. पुस्तकामध्ये प्रभू येशू यांनी कशाप्रकारे ख्रिस्ती धर्म प्रसार केला व त्यांना आलेल्या अडचणी आणि लोकांचा त्यांना मिळालेला प्रतिसाद व तिरस्कार, त्यांची कश्याप्रकारे हत्या केली गेली हे सविस्तर पणे दाखवले आहे.

Itihas class 11 - Maharashtra Board: इतिहास इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये १०००० वर्षांहूनही अधिक अशा अत्यंत प्रदीर्घ कालखंडाचा इतिहास सामावलेला आहे. इसवी सनपूर्व ८०००-७००० च्या सुमारास भारतीय उपखंडामध्ये विविध ठिकाणी प्राथमिक अवस्थेतील शेतीची सुरुवात झाली. या काळापासून सुरुवात करून मध्ययुगीन इतिहासापर्यंतची सुसूत्र मांडणी या पुस्तकात केलेली आहे. एवढ्या प्रदीर्घ कालखंडातील सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या वाटचालीची मांडणी भारताच्या संदर्भात करत असताना, प्रत्येक पाठ त्या वाटचालीतील एकेका टप्प्याचा प्रातिनिधिक ठरावा अशा पद्धतीने पाठांची रचना केलेली आहे. अर्थातच या पद्धतीच्या मांडणीमध्ये ऐतिहासिक कालक्रम आधारभूत असला तरी त्यामागील संकल्पनात्मक आणि प्रक्रियात्मक साखळी स्पष्ट करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.

Itihas class 12 - Maharashtra Board: इतिहास इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. बारावीच्या पाठ्यपुस्तकात आपणास युरोप, अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया या खंडांचा ओझरता इतिहास ज्ञात करून देण्यात आला आहे. युरोपातील प्रबोधन, वसाहतवाद, वसाहतवादाविरुद्ध भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात उभारला गेलेला लढा, निर्वसाहतीकरणाची चळवळ, शीतयुद्ध आणि बदलता भारत यांचा अंतर्भाव या पाठ्यपुस्तकात केला आहे.

Itihas Digest class 11 - Maharashtra Board Guide: इतिहास डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

इतिहास इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला पाठाचा सारांश देण्यात आला आहे. त्यावरून त्त्या प्रकरणात समाविष्ट असलेला पाठाचा आशय विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत. या मार्गदर्शकात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. तसेच या मार्गदर्शकाच्या शेवटी प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार प्रथम व द्वितीय सत्रान्त परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका व अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत.

Itihas va Nagrikshstra class 6 - Maharashtra Board: इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इतिहासामध्ये अकरा व नागरिकशास्त्रामध्ये पाच प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात इतिहासाच्या भागात 'प्राचीन भारताचा इतिहास' दिलेला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती आणि परंपरा यांची सर्वांगीण माहिती मिळावी तसेच याद्वारे त्यांची सामाजिक एकात्मतेसंबंधीची जाणीव वाढीस लागावी हा उद्देश आहे. नागरिकशास्त्राच्या भागात 'स्थानिक शासन संस्था' याविषयी माहिती घेत असताना विकासाच्या योजनांमध्ये स्थानिक जनतेचा सहभाग, महिलांच्या सहभागाचा आणि त्यांच्या सहभागातून झालेल्या बदलांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. आपल्या देशातील कारभार संविधान, कायदे व नियमांनुसार चालतो हे विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत सांगितले आहे.

Itihas va Nagrikshstra class 7 - Maharashtra Board: इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इतिहासामध्ये तेरा व नागरिकशास्त्रामध्ये सहा प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठ्यपुस्तकात इतिहासाच्या भागात 'मध्ययुगीन भारताचा इतिहास दिलेला आहे. मध्ययुगीन भारताच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे स्थान व भूमिका केंद्रस्थानी ठेवून पाठ्यपुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे. नागरिकशास्त्राच्या भागात भारतीय संविधानाची ओळख करून देण्यात आली आहे. भारताच्या संविधान निर्मितीची पार्श्वभूमी, संविधानाची उद्देशिका, संविधानातील मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व हा आशय मांडण्यात आला आहे.

Itihas Va Rajyashastra Digest class 10 - Maharashtra Board Guide: इतिहास व राज्यशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, मार्गदर्शकाचे दोन भाग इतिहास व राज्यशास्त्र दिलेले आहेत. या 'नवनीत' मार्गदर्शकात पाठाच्या प्रारंभी पाठात आलेले महत्त्वाचे सन व घटना चौकटीत दिलेल्या आहेत. प्रत्येक पाठातील महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीस दिलेले आहेत, पाठात आलेल्या काही संकल्पना स्पष्ट झाल्या नाहीत तर तो आशय कळणार नाही; म्हणून तेथेच चौकटीत त्यांचे स्पष्टीकरणही दिलेले आहे. प्रत्येक पाठाखाली दिलेल्या स्वाध्यायांतील सर्व प्रश्नांची आदर्श व अचूक उत्तरे दिलेली आहेत. संकल्पनाचित्रे पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा, ओघतक्ता तयार करा इत्यादी कृतीआधारित नव्याने आलेल्या प्रश्नप्रकारांचा सराव होण्यासाठी स्वाध्यायांखेरीज अनेक कृती या मार्गदर्शकात दिलेल्या आहेत.

Jhunj Sangharsh Jivanacha - Novel: झुंज संघर्ष जीवनाचा - कादंबरी

by Govind Gadhari

लेखकाच्या स्वत:च्या जीवनातील सत्य घटीत घटनांवरील हे लिखाण आहे. दुर्गम भागात रानोमाळ भटकंती करणाऱ्या असंघटित समाजातील एका दुर्बल आणि दुबळ्या कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीच्या जीवनात बालपणापासून ज्या संकटमय घटना घडल्या त्या त्याने अनुभवल्या व त्यांना ते कस कसे सामोरे गेले आणि त्यात त्यांनी अनुभवलेली, झेललेली संकटे व त्यावर कशी मात केली त्याचे त्यांनी गावरान मराठी भाषेत कथन केले आहे. प्रदीर्घ काळापर्यंतची त्यांची सत्य घटनांवर आधारीत अशी ही झुंज आहे.

Karmache Vidnyan: कर्माचे विज्ञान

by Dada Bhagwan

कर्म काय आहे? कशा प्रकारे कर्म बांधले जाते? चांगल्या कर्मांनी वाईट कर्म धूतली जातात का? चांगली माणसं दु:खी का होत असतात? कर्म बांधणे थांबवायचे कसे? कर्मांमुळे बंधनात कोण आहे, शरीर की आत्मा? आपली कर्म संपतात तेव्हा आपला मृत्यु होतो का? संपूर्ण जग कर्माच्या सिद्धांताशिवाय दुसरे काहीच नाही. बंधनाचे अस्तित्व हे पूर्णपणे तुमच्यावरच अवलंबून आहे, तुम्ही स्वत:च त्यासाठी जबाबदार आहात. सर्वकाही तुमचेच आलेखन आहे. तुमच्या शरीराच्या बांधणीसाठी सुद्धा तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. तुमच्या समोर जे येत आहे ते सर्व तुम्हीच रेखाटलेले आहे, इतर कोणीही त्यास जबाबदार नाहीच. अनंत जन्मांसाठी मात्र तुम्हीच ‘‘संपूर्णपणे आणि एकटेच जबाबदार आहात’’-परम पूज्य दादाश्री. कर्मांची बीजं मागच्या जन्मी टाकलेली होती त्याची फळे ह्या जन्मात मिळतात. तर ही कर्माची फळे देतो कोण? ईश्वर? नाही, त्यास निसर्ग किंवा व्यवस्थित शक्ति (सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडेन्स) म्हटले जाते, ती देत असते. परम पूज्य दादाश्रींनी स्वत:च्या ज्ञानाद्वारे कर्माचे विज्ञान जसे आहे तसे उघड केले आहे. अज्ञानतेमुळे कर्म भोगत असताना राग-द्वेष होतात जेणे करुन नवीन कर्म बांधली जातात, जी मग पुढच्या जन्मी परिपक्व होतात आणि ती भोगावी लागतात. ज्ञानी नवीन कर्म बांधायचे थांबवतात. जेव्हा सर्व कर्म संपूर्णपणे संपतात तेव्हा अंतिम मोक्ष होतो.

Khelu Karu Shiku class 2 - Maharashtra Board: खेळू करू शिकू दुसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya pathyapustak Nirmiti Va Abhyas Sanshodhan Mandal Pune

खेळू, करू, शिकू या पुस्तकामध्ये मुलांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी उपयोगी आहे. तसेच या पुस्तकामध्ये भरपूर चित्रे आहेत. ति पाहून कोणते खेळ कसे खेळावे हे कळण्यास मदत होईल. विविध शारीरिक हालचाली करणे, नवे खेळ आणि शर्यती शोधणे, साधी राखी, कागदाचे भिरभिरे, वाळलेल्या पानाफुलांपासून सौंदर्याकृती तयार करणे, कथा, संवाद, कविता, कोडी रंगकाम, शिल्प, वाद्यांची ओळख करून घेणे हे दाखवले आहे.

Khelu Karu Shiku class 3 - Maharashtra Board: खेळू करू शिकू इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya pathyapustak Nirmiti V Abhyas Sanshodhan Mandal Pune

खेळू, करू, शिकू या पुस्तकामध्ये मुलांना विविध शारीरिक हालचाली करणे, नवे खेळ आणि शर्यती शोधणे, फुलपाखरू, बचतपेटी, नारळाच्या करवंटीपासून कलाकृती तयार करणे, कथा, संवाद, कविता, कोडी, रंगकाम, शिल्प, वाद्यांची ओळख करून घेणे हे सारे या पुस्तकात दाखवले आहे.

Klesh Rahit Jeevan - Novel: क्लेश रहित जीवन - कादंबरी

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल. दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Loksankhya Bhugol Paper 1 SYBA Third Semester - SPPU

by Abc

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विशेष स्तरावर हा ‘लोकसंख्या भूगोल’ विषय लागू केला आहे. कोणत्याही देशाच्या दृष्टीने लोकसंख्या ही एक संपदा आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक त्याचबरोबर लोकसंख्याविषयक घटकांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर व वाढीवर होत असतो. त्याहूनच विविध प्रदेशात लोकसंख्येची रचना तयार होते. लोकसंख्या ही एक संपदा असली तरी साधनसंपदेच्या तुलनेत लोकसंख्या जास्त झाल्यास संपदेवर अधिक ताण पडून दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरले आहे. 'लोकसंख्या' या विषयावर अनेक भाषांमध्ये ग्रंथ उपलब्ध आहेत. लोकसंख्या व भौगोलिक पर्यावरण यांचा संबंध स्पष्ट करताना आणि आपल्या देशातील लोकसंख्याविषयक अभ्यास मांडणी करताना अतिशय सोप्या भाषेचा वापर करून अभ्यासकांच्या हाती हे पुस्तक देण्याचा हेतू या पुस्तकाने साध्य केला आहे.

Maharashtrartil Sthanika Svarajya Sanstha T.Y.B.A - Pune University

by R. G. Waradkar Nanda Rashinkar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी. ए. भाग - 3 च्या राज्यशास्त्र विषयासाठी जो नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे त्यात 'महाराष्ट्रातील स्थानिक संस्था' हा एक पेपर आहे. त्याला अनसरून प्रस्तुत पुस्तक लिहिलेले आहे. तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयासाठी हे पस्तक उपयुक्त आहेच; तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याठीसुद्धा हे पुस्तक विशेष उपयुक्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती, आकृतिबंध स्थानिक स्वराज्य संस्थांना येणाऱ्या अडचणी, उदयास येणारे नेतृत्व त्याचे सविस्तर विवेचन विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे.

Mahatma Gandhiche Vichar - Novel: महात्मा गांधीचे विचार - कादंबरी

by R. K. Prabhu U. R. Rao

श्री प्रभू आणि श्री राव यांनी संपादित केलेल्या 'महात्मा गांधींचे विचार' या पुस्तकाची सुधारित आणि वाढवलेली आवृत्ती नवजीवन प्रकाशनातर्फे प्रकाशित होते आहे, या नवीन आवृत्तीत गांधीजींचे अखेरच्या क्षणापर्यंतचे विचार उद्धृत करण्यात आले आहेत. त्यामुळे ही आवृत्ती अद्ययावत बनली आहे, लोकोत्तर पुरुषांच्या मनात काय असते हे कोणाला माहीत हे भवभूतीचे वचन सर्वश्रुत आहे. गांधीजी लोकोत्तर पुरुष असतानाही त्यांनी आपले मन लोकांसमोर उघडे करून ठेवले होते. आपल्याकडून त्यांनी काहीच दडवून ठेवले नव्हते. तरीही त्यांच्या जीवनाचे अंतिम पर्व, ज्याला मी स्वर्गारोहण पर्व असे नाव दिले आहे, एवढेच नाही तर ते भगवान कृष्णाच्या अंतिम लीलेसारखेच वाटले. ते गूढ उकलण्याकरिता तर गांधीजींनाच परत यावे लागेल. परंतु तोपर्यंत सत्याचा शोध घेणाऱ्या सर्वोदय साधकांना गांधीजींचे विचार समजण्याकरिता या पुस्तकाची नक्कीच मदत होईल अशी मला आशा आहे.

Manasashastra class 11 - Maharashtra Board: मानसशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मानसशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये मानवी मनाचा, मेंदूचा आणि मुख्यतः मानवी वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र या विषयात केला जातो. कुठलीही कृती, विचार करताना नक्की मानवी मेंदूत काय घडते? व कोणत्या कारणांच्या आधारे प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्ती पेक्षा भिन्न वर्तन करते? भावना व विचार हे मानवी वर्तनावर कसा परिणाम करतात? मानसिक समस्या व आजार कसे उद्भवतात? त्यामागची कारणे व उपचारपद्धती यांचा समावेश या विषयात होतो. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.

Refine Search

Showing 26 through 50 of 112 results